मुंबई २२ डिसेंबर, २०१६ : कलर्स मराठीवर चाहूल हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेमधील जेनी हि अल्पवधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे तर मालिकेमध्ये वापरण्यात आलेली वेगवेगळी कॅमेरा टेकनिक्समुळे प्रेक्षकांना हि मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी वाटत आहे. मालिकेच्या कथानकाबद्दल तर उत्कंठा आहेच पण आता एक वेगळीच चाहूल लागली आहे, जेनी आणि सर्जेराव यांच्या साखरपुड्याचा विचार घरच्यांच्या मनात आला आहे,यासाठी जेनी आणि सर्जेराव उत्सुकदेखील आहेत. पण हे सगळ होत असताना सर्जेरावांना एक प्रश्न आहे कि त्यांची बालपणाची मैत्रीण निर्मला गेली कुठे? तिचा पत्ता कुठेच लागत नाहीये. त्यावर बबन्यादेखील गायब आहे. हा बबन्या सर्जाला मिळेल का? निर्मला कुठे गेली आहे हे त्याला कळेल का? हि सगळीच निरुत्तरित प्रश्न आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.
या साखरपुड्यामध्ये अडथळे कोण निर्माण करत आहे ? सर्जा आणि जेनीचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडेल का ? बबन्या सर्जाला निर्मला कुठे आहे हे सांगू शकेल का ?जेनीला आणि सर्जाला दूर करण्याचा प्रयत्न कोण करत आहे आणि का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी बघत रहा चाहूल फक्त कलर्स मराठीवर.