Chaahol | Drone Camera Story


कलर्स मराठीवर ड्रोन कॅमेराचा “चाहूल” मालिकेच्या प्रोमोद्वारे पहिल्यांदा वापर !
IMG-20161124-WA0003DRONE 1
मुंबई २ डिसेंबर २०१६ : आजकल टेलीव्हीजनवर वेगवेगळ्या पद्धती वापरून शुटिंग केले जाते. मालिकेला मनोरंजक आणि आकर्षक करण्यासाठी बऱ्याच प्रकारची तंत्र वापरली जातातज्याद्वारे चित्रिकरणामध्ये नाविन्यता आणली जाते. अश्याप्रकारच काहीस कलर्स मराठीने या वेळेस केले आहे. कलर्स मराठीवरील चाहूल मालिकेचे प्रोमोज सध्या लोकांच्या पसंतीस आले आहेत तसेच प्रोमोजबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा देखील होत आहे. प्रोमोजमधून मालिकेबद्दलची आणि कथानकामध्ये काय असेल याबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे. या प्रोमोजमध्ये पहिल्यांदा कलर्स मराठीने ड्रोन कॅमेराचा वापर केला आहे.
ड्रोन कॅमेराची वैशिष्ट्य म्हणजे मोठा कॅनव्हास शूट करणं सोप जात. कॅमेरा छोटा असल्या काराणाने जास्त तामझाम नसतो त्यामुळे कुठेही सहजासहजी पोहचू शकतो. वेगळ्या प्रकारची शॉट्सदृश्य चित्रित करणं सोप जात. सगळ्यात म्हत्वाच म्हणजे top शॉट्स घेण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अस साधन आहे अस म्हणता येईल. थोडक्यात सांगायचं झाल तर दृश्यचमतकृती साठी वापरल जातो. या सगळ्याचा उपयोग चाहूल मालिकेचा प्रोमो शूट करताना देखील झाला.
तेंव्हा बघायला विसरू नका चाहूल १२ डिसेंबर पासून रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: