तमाशासम्राज्ञी ‘विठा’ रुपेरी पडद्यावर - TAMASHA EMPRESS “VITHAA” ON THE SILVER SCREEN

लाज धरा पाव्हनं जरा जनाची मनाची
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?...
असं म्हणत महाराष्ट्राच्या तमाम रसिकांवर हुकुमत गाजवलेली ‘तमाशासम्राज्ञी’ म्हणजे विठाबाई नारायणगांवकर.. वयाच्या अकराव्या वर्षापासून घुंगरांच्या तालावर नाचू लागलेल्या विठाबाईंनी वयाच्या सत्तरीपर्यंत महाराष्ट्रातील तमाशा फड गाजविला. ‘तमाशा’ या लोककलेला सरकार दरबारी व जनमानसात प्रतिष्ठा मिळवून देत या कलेसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. प्रचंड प्रसिद्धी, मानसन्मान आणि पैसा मिळवूनही उतारवयात त्याच्या पदरी निराशाच आली.
‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई नारायणगांवकर यांचे अलौकिक जीवन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘विठा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटाची निर्मिती ‘नम्रता एन्टरटेण्मेंट प्रा. लि.’ या चित्रपट निर्मिती संस्थेने ‘आपला पिक्चर’ या निर्मिती संस्थेच्या सहयोगाने केली आहे. नुकतेच ‘विठा’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन तांत्रिक सोपस्काराचे काम झपाट्याने हाती घेण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते दिनेश अग्रवाल, सौ. प्रितम दिनेश अग्रवाल, शुभदा भोसले आणि स्वतः पुंडलिक धुमाळ आहेत.
‘विठा’ चित्रपटात विठाबाई नारायणगांवकर यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेत्री उर्मिला कानिटकर- कोठारे यांनी साकारली असून सोबत उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘विठा’ चित्रपटाचे पटकथा – संवाद पुंडलिक धुमाळ आणि शंतनू रोडे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण सिनेमॅटोग्राफर संजय जाधव आणि देवेंद्र गोलतकर यांनी केले असून कलादिग्दर्शन महेश साळगांवकर यांचे आहे. ‘विठा’ या तमाशासम्राज्ञीचे जीवनपट उलगडणाऱ्या चित्रपटाचे   संगीत देखील तितकेच खास असणार आहे. अजित परब, समीर म्हात्रे आणि रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. फुलवा खामकर यांचे नृत्यदिग्दर्शन, अनिल पेमगिरीकर व महेश बराटे यांची रंगभूषा तर संजीव राजसिंह यांनी या चित्रपटाची वेशभूषा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाचे संकलन विजय खोचीकर करीत आहेत. पुंडलिक धुमाळ दिग्दर्शित ‘विठा’ सिनेमात आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या विठाबाईंच्या आयुष्यातील असंख्य पैलू पहायला मिळणार असून या चित्रपटाचे तांत्रिक सोपस्कार काम झपाट्याने पूर्णत्वास जात आहेत.
नवीन वर्षात ‘विठा’च्या निमित्ताने एक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना पहायला मिळेल हे नक्की !

Laaj dharaa pavna jara janachi manachi 
Pota satti nachate mi parva kunachi?....
Singing these lines the Tamasha Empress ruled over the hearts of tamasha afficianados of Maharashtra. The Empress was Vitthabai Narayangaonkar… Starting at the age of eleven she danced to the tune of the ghungroos well into her seventies, setting the stage, all over Maharashtra, on fire. She is responsible in getting government and public recognition for “Tamasha” the folk art of Maharashtra, thereby becoming the first female artist to win the president’s award for this art. In spite of earning immense popularity, prestige, honour and money, she had only disappointments during the last stages of her life.
To bring the extraordinary life of the “Tamasha Empress” Vitthabai  Narayangaonkar, to the general public, a movie “Vittha” based on her life, will soon hit the screens. “Namrata Entertainment Pvt. Ltd” a film production company, in collaboration with another film production company “Aapla Picture” has produced this film. Recently the movies picturisation was completed and now the technical and post production work is being carried out in full swing. The movie is directed by Pundalik Dhumal, the producers are Dinesh Agrawal, Mrs. Pritam Dinesh Agrarwal, Shubhadha Bhosale and Pundalik Dhumal himself.
In the movie “Vittha”, actress Urmila Kanitkar-Kothare, plays the main role of Vitthabai Narayangaonkar. Upendra Limaye will be seen playing a very important role. The screenplay and dialogues of “Vittha” are written by Pundalik Dhumal and Shantanu Rode. Sanjay Jadhav and Devendra Golatkar are the cinematographers, the art director is Mahesh Salgaonkar. “Vittha” the unfolding of the life of the Tamasha Empress has an equally impressive music. Ajit Parab, Sameer Mhatre and Rohit Nagbhide are the music directors. Phulwa Khamkar is the choreographer, Anil Pemgirikar and Mahesh Barate are the make-up artists and Sanjeev Rajsingh is in charge of costumes. The editing is by Vijay Khochikar. Pundalik Dhumal directed “Vittha” will show us the numerous and different aspects of the life of Vittahbai, who loved her art deeply. The other technical and post production work is going on at a very rapid pace.
In the coming New Year, it is certain that the movie goers will get to see a high quality movie “Vittha.

Subscribe to receive free email updates: