2 MAD च्या मंच्यावर पलक बेरड आणि तन्वीर शेखचा जलवा! संजय जाधव : तन्वीर शेख पॉपिंगचा बादशहा ...

IMG_6389
मुंबई३० जानेवारी २०१७ : नृत्य म्हणजे बेधुंदपणानृत्य म्हणजे निखळ आनंदआणि नृत्य म्हणजे Madness. याच सूत्रावर 2 MADहा कार्यक्रम कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. एखाद्या गोष्टीबद्दल जर निष्ठा असेल,त्याबद्दल जर Madness असेल तर कुठल्याही अडथळ्यावर मात करून माणूस ती गोष्ट मिळवण्याचा वा ती जोपासण्याचा प्रयत्न करतो.एखाद्या डान्सर करता सर्वात महत्त्वाचं कायअसतं ? गाण्याची बीट पकडणंबीटवर डान्स करणंआणि तेच ऐकू आले नाहीत तर? 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमामध्ये पलक बेरड आणि तन्वीर शेख यांचे अफलातून नृत्य प्रेक्षकांना ऑडीशनपासून बघायला मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये ते दोघेही एकही बीट न विसरता अचूक असे नृत्य करतातहे खरच कौतुकास्पद आहे. या दोघांनीहि तिन्ही परीक्षकांची मने जिंकली आहेत. पलक नागपूरची आहे तर तन्वीर मुंबईचा आहे. पलक कर्णबधीर आहे तर तन्वीरला कमी ऐकू येत. या दोघांच्याहि नृत्यकौशल्याला बघून तिन्ही परीक्षक थक्क आहेत हे नक्की. हे दोघेही top २० मध्ये जाऊन पोहचले आहेत. आता ते किती पुढे जातील हे पुढेच कळेल…
पलकला तिच्या आई – वडीलांनी दत्तक घेतले आहेपण त्यांनी दिलेल्या प्रेमामध्ये कधीच कश्याचीही कमतरता ठेवली नाही. आपल्या मुलांना तिच्या अपंगत्वावर मात करून सर्वसामान्य आयुष्य जगायला मिळावं या करता पलकचे आई वडील जीवाचं रान करतात. पलक ३ वर्षाची असताना तिच्या आई वडिलांना कळाले कि ती कर्णबधीर आहे. तेंव्हापासून पलकच्या आई वडीलांनी तिला अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणे वाढवल. पलक नॉर्मल शाळेमध्ये गेलीतिला चांगले शिक्षण मिळावे, तिची नृत्याची आवड जोपासली जावी यासाठी तिच्या आई – वडिलांनीखूप मेहेनत घेतली आहे आणि अजूनहि घेत आहेत. पलकचं टॅलेंट या सगळ्या पलीकडचं आहेकर्णबधिर असूनही एखाद्या धडधाकट डान्सर ला लाजवेल असा performance पलक देतेतिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती तिने सर्वसामान्यांसारखं तरी आयुष्य जगावं....पण पलकचं टॅलेंट  तिला सर्वार्थाने असामान्यठरवतं... पलकचे चाहूल या मालिकेच्या शीर्षक गीतावर केलेले नृत्य देखील खूपच सुंदर होते ज्याप्रकारे तिने ते राहुल कुलकर्णी बरोबर सादर केले ते पाहून 2 MAD च्या सेटवर जमलेले सगळेच प्रेक्षक थक्क झाले.
लहानपणापासून मुंबईत वाढलेला असला तरी तन्वीर ची मुळं रुजलीयेत ती पंढरपुरात, म्हणूनचवारकाऱ्यांमध्ये विठुमऊली करता जे प्रेम आणि झपाटलेपण दिसतं ,तेच तन्वीर मध्ये डान्स करताना दिसतंतन्वीरला ऐकू कमी येतं,त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना त्याच्या डान्स मधल्या कौशल्याच्याकौतुकाहुन अधिक त्याच्या भवितव्याची काळजी वाटते, कारण काहीही झालं तरी तन्वीरला डान्स मध्येचकरीअर करायचंय...
पलक आणि तन्वीरच्या जिद्दी ला आणि तिच्या आई वडिलांच्या समर्पण खरच कौतुकास्पद आहे. तेंव्हा बघत रहा 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर सोम आणि मंगळ रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: