अभिनेत्री सविता मालपेकर यांची कन्या केतकी मालपेकर आणि ‘राव ग्रुप ऑफ केमिकल्स कंपनीज्’च्या डायरेक्टर अमृता राव या दोघींनी मिळून फॅशन इंडस्ट्रीत नव्याने पाऊल टाकलं आहे. त्यांच्या ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ या अद्ययावत पार्लरचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री मा.श्री. विनोद तावडे, शर्मिला ठाकरे, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, सुकन्या मोने यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली.
आई ग्लॅमर क्षेत्रात काम करत असल्यामुळे केतकी यांना लहानपणापासूनच फॅशन दुनियेची जवळून ओळख झाली. ‘सतत बदलणाऱ्या या ग्लॅमवर्ल्डमध्ये स्वबळावर काहीतरी करून दाखवावं ही माझी मनीषा ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ द्वारे पूर्ण झाली’ असल्याचं केतकी यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘राव ग्रुप ऑफ केमिकल्स कंपनीज्’च्या डायरेक्टर आणि दूरदर्शनमध्ये गेली २४ वर्ष वृत्त निवेदिका म्हणून कार्यरत असणाऱ्या अमृता राव या ‘सील्व्हेट हेअर अँड ब्युटी बार’च्या मुख्य इन्व्हेस्टर असून त्यांनी, ‘मला मुळातच शिक्षण आणि कलांची आवड असल्यामुळे मी या पार्लरच्या उभारणीस केतकीला मदत केल्याचे’ यावेळी सांगितले.
अमृता राव आणि केतकी मालपेकर यांच्या अत्याधुनिक ब्युटी बार मध्ये तुम्हाला विविध ट्रिटमेंट्स, सुविधांचा लाभ घेता येईल. हेअर ड्रेसिंग, हेअर कलरिंग याचबरोबर अलीकडे तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ असणारी नेल्स आर्ट, नेल्स एक्स्टेंशन यांसारख्या ट्रिटमेंट्सचा लाभ येथे घेता येईल. येथील अत्याधुनिक टेक्निक्स व उत्तम टेक्निशियन्सच्या साथीने तुम्ही अधिकाधिक सुंदर दिसू शकता पण त्यासाठी तुम्हाला एकदा तरी ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ला नक्की भेट द्या.
संपर्क : केतकी मालपेकर – ९९३०१९१०७२ अमृता राव – ९८२१०१२६९२
सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार :
१४-प्लॉट नो. ३३३, कार्ड मेन्शन, शीतलादेवी रोड, युनियन बँक जवळ, माहीम, मुंबई-१६