हिंदी स्टार्सना लागले 'बाळा' गाण्याचे वेड

रणवीर, बॉबी, तुषार, जॅकलीन, तापसी, परिणीतीचा व्हिडियो व्हायरल
गणेश आचार्य, म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले लाडके व्यक्तिमत्व ! अश्या या लाडक्या व्यक्तीमत्वाने दिग्दर्शित केलेल्या 'भिकारी' सिनेमाच्या गाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे, नुकतेच प्रदर्शित झालेले 'बाळा' या गाण्याने तर हिंदी कलाकारांना देखील वेड लावले आहे. स्वप्नील जोशीवर चित्रित करण्यात आलेल्या या सिनेमाच्या 'बाळा' गाण्याची स्टेप्स सध्या भरपूर व्हायरल झाली असून, याचे अनुकरण हिंदीचे प्रसिद्ध स्टारमंडळी करताना दिसत आहे. डान्समास्तर गणेश आचार्य यांच्या सिनेमातील 'बाळा' गाण्यावर रणवीर सिंग, बॉबी देओल, तुषार कपूर, कुणाल खेमू, वरूण धवन, अर्षद वारसी या हिंदी अभिनेत्यांनी तर परिणीती चोप्रा, जॅकलीन फर्नांडीस आणि तापसी पन्नू या अभिनेत्रींनी ठेका धरला असल्याचा विडीयो व्हायरल झाला आहे. यात श्रेयस तळपदे हा हिंदीत चमकणारा मराठी चेहरा देखील आपल्याला पाहायला मिळत असून, भिकारी सिनेमाच्या प्रदर्शनाची ही मंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत. 
इग्लंड येथे शूट करण्यात आलेल्या या गाण्यात स्वप्नीलने पहिल्यांदाच 'हिप हॉप' केलेला पाहायला मिळत असून, या गाण्यातील त्याची सिग्नेचर स्टेप्स खूप गाजत आहे. स्वप्नीलच्या चाहत्यांमध्ये देखील हे गाणे खूप प्रसिद्ध झाले आहे. स्वप्नीलच्या नृत्याविष्काराचा हा नमुना असून, या गाण्यासाठी त्याने घेतलेली मेहनतदेखील दिसून येते.
मी मराठा फिल्म प्रॉडक्शन शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन प्रस्तूत ह्या सिनेमा येत्या ४ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यात ऋचा इनामदार ही नवोदित अभिनेत्री झळकणार असून, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा हे कलाकार देखील आपापल्या प्रमुख भूमिकेत असतील. 

Subscribe to receive free email updates:

Related Posts :