मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या युवा संगीतकार आणि गायक आपल्या कामाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतायेत. मिळालेल्या संधीच सोनं करत संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवतायेत. यातलंच एक नाव म्हणजे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर.
घरातल्या सांस्कृतिक वातावरणामुळे निर्माण झालेली संगीताची गोडी आणि त्यानंतर ‘सारेगमप’, वर्ल्ड अंताक्षरी’ या स्पर्धेतून भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्वरूप यांना ओळख आणि नाव मिळवून दिलं. त्यानंतर स्वरूप यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. ‘एक रिश्ता’ या हिंदी चित्रपटाने अल्पावधीतच बॉंलीवूडचा पहिला ब्रेक मिळवून दिल्यानंतर अनेक अल्बम्स व हिंदी, मराठी चित्रपटांसाठी स्वरूप यांनी आपला आवाज दिला. ‘मेड इन चायना’, ‘गुरुपौर्णिमा’, ‘क्लासमेट्स’, ‘क्या कूल है हम’ यासारखे चित्रपट व ‘तुला लागली कुणाची हिचकी’, ‘मला लगीन करायचं’ या अल्बमसचा समावेश आहे.
संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास, पत्नीची व कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे स्वरूप यांचा संगीतातला प्रवास नव्या वळणावर येऊन पोहचला आहे. कोणत्याही एका चौकटीत अडकून न राहता प्रत्येक प्रकारच्या संगीताला समर्थपणे साथ करता आली पाहिजे असं मानणाऱ्या स्वरूप यांनी नव्या प्रतिभेला व्यासपीठ मिळावं यासाठी आपल्या वाढदिवशी म्हणजेच २५ जुलैलाswaroop bhalwankar official हे ‘यु ट्यब ‘चॅनल’ लाँच केलं आहे. याबाबत बोलताना स्वरूप सांगतात की, आजची तरुण पिढी ही तंत्रज्ञानप्रेमी आहे. तंत्रज्ञानाची कास धरून आपल्या कलेसाठी तरुण त्याचा उपयोग करून घेत आहेत. असंख्य अनोळखी पण गुणी गायक, वादकांची ओळख व्हावी यासाठी ‘युट्यब हे सशक्त माध्यम आहे. या ‘युट्यब ‘चॅनल’सोबतच ‘गुलाबी रिमझिम’ हा नवाकोरा रोमेंटिक व्हिडिओ अल्बमसुद्धा रसिकांच्या भेटीला आणला आहे. माझ्या इतर गाण्यांना रसिकांनी जे भरभरून प्रेम व प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे ‘गुलाबी रिमझिम’ हा अल्बमही प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास स्वरूप यांनी व्यक्त केला.
स्वरूप भालवणकर युट्यब चॅनल - swaroop bhalwankar official
‘गुलाबी रिमझिम’ युट्यब लिंक- https://youtu.be/5kXsLkEx77s