अभिजात चित्रपटांच्या शौकिनांसाठी रंगणार चित्रभारती चित्रपट महोत्सव



प्रभात चित्र मंडळा च्या वतीने ‘चित्रभारतीचे आयोजन ठाणे आर्ट गिल्ड आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट माटुंगायाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.१५ मे ते १८ मे दरम्यान  वेलिंगकर इन्स्टिट्यूट येथे चित्रभारती चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रसिकांना ८ दर्जेदार चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे.
चार दिवसांच्या या चित्रपट महोत्सवात विविध भारतीय भाषांमधीलराष्ट्रीय पातळीवरील आठ दखलपात्र चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. आस्वादक वृत्ती वाढीस लागावी आणि समाजाची अभिरूची घडावीयासाठी अभिजात चित्रपट हे एक सक्षम माध्यम आहे. व्यावसायिक प्रवाहातले लोकप्रिय सिनेमे सहज बघायला मिळतात. मात्रकसदार सिनेमे बघण्यासाठी अनेकदा वाट वाकडी करावी लागते. बऱ्याचदा इच्छा असूनही दर्जेदारअभिजात चित्रपट बघण्याची संधी मिळत नाही. म्हणूनच निवडक आठ चित्रपटांचा खजिना  या चित्रपट महोत्सवाच्या रुपाने खुला करण्यात येणार आहे.
गेली अनेक वर्षे सुजाण चित्रपट रसिक घडवण्याचा वसा घेतलेले प्रभात चित्र मंडळ यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  १५मे रोजी सायं. ६ वाजता चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ मयत’ या मराठी लघुपटाने होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलावंताचा सन्मान करण्यात येणार आहे.
मंकी बात (मराठी)थोंडीमुथलम ध्रिक्सक्षियम (मल्याळी)कच्चा लिंबू (मराठी)टेक ऑफ (मल्याळी)इशु (असामी)सर्वनाम (मराठी) या चित्रपटांबरोबरच साउंड ऑफ सायलेन्स या तिबेटिअन चित्रपटाचाही आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
या चित्रपट महोत्सवाच्या  नोंदणीसाठी संपर्क : प्रभात चित्र मंडळ , 1 मजला शारदा सिनेमा बिल्डिंगनायगावदादर पूर्व.   दूरध्वनी २४१३१९१८

Subscribe to receive free email updates: