Zee Yuva | Mothers day Quotes | Phulwa Khamkar, Suyash Tilak, Sankarshan Karhade, Ashwini Kasar

मातृ देवो भव!!!
सुयश टिळकअभिनेता (बापमाणूस - झी युवा)
माझी आई माझ्या जवळची मैत्रीण हे. मला काही कमी पडू नये त्यासाठी ती दिवसाचे २४ तास कष्ट करतेमी लहान होतो तेव्हा पासून ती स्वतः सिलेब्रिटी असून घर आणि काम याचा उत्तम बॅलन्स कसा साधायचा हे तिच्याकडूनशकत आलो आहेतिचं भरतनाट्यमची एक मोठी गुरु असणं आमच्या आई मुलाच्या नात्यामध्ये कधीच डोकावलं नाहीआज मी जे काही आहे ते माझ्या आई आणि बाबांमुळे आहे.
अश्विनी कासारअभिनेत्री (कट्टी बट्टी - झी युवा)
माझ्या आईला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि तिकडच्या फेमस डिशेस, लोकल फूड खायला खूप आवडतंला वाटतं की मला पण ही आवड तिच्यामुळे निर्माण झालीतिच्यामुळेच मला गाणी ऐकण्याचीकविता करण्याची, आपले विचार लेखणीतून मांडण्याची गोडी लागलीआई ही एकच शी व्यक्ती असते जी तुम्हाला कुठल्याही अपेक्षेशिवाय किंवा अटीशिवाय प्रेम करतेआपण तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून कृतज्ञता व्यक्त केलीतिचीकाळजी घेतली तरीही ती खुश होतेसगळ्या आईंना मी मातृदिनाच्या शुभेच्छा देते.
फुलवा खामकरकोरिओग्राफर  (परीक्षकडान्स महाराष्ट्र डान्स - झी युवा)
माझ्या आईकडून मला डान्सची आवड निर्माण झालीमी माझ्या आईकडून खूप काही शिकलेमी स्वतः एक ई आहे त्यामुळे आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं ही किती मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहेमीसर्व आईंना हाच एक संदेश देऊ इच्छिते की तुमच्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याआधी एक सुजाण आणि चांगलं माणूस बनवा.
Sankarshan Karhade - 
माझी आई म्हणजे; सकारात्मकता, संयम, सात्विकपणा आणि अप्रतिम स्वयंपाक ह्या सग्गळ्याचा साठा आहे. व्हाॅट्स ॲप च्या जोक शेअर करण्यापासुन ते योग्य भाषेत कान टोचण्यापर्यंत.. आणि कामातल्या कौतुकापासुन ते संसारातल्या हितगुजापर्यंत सग्गळ्या गोष्टींवर ती माझ्याशी बोलु शकते.. माझ्या बाबांची ३७ वर्षांची बॅंकेतली यशस्वि नोकरी, ३ भावंडांचं योग्य संगोपन आणि करीयर हे तिच्याच निस्वार्थी कष्टाचं फलीत आहे. जगण्याची हि दृष्टी तिने नक्कीच तिच्या आई कडनं घेतली.. आणि ताई पर्यंत अजुन प्रभावीपणे पोचवलीये.. तिला नमस्कारच नाहि.. सष्टांग दंडवत आहे..

Subscribe to receive free email updates: