मुंबई, २ डिसेंबर २०१६ : कलर्स मराठीवरील सरस्वती मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. तितिक्षा तावडे म्हणजे तुमची लाडकी सरस्वती हि सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. मालिकांच्या शुटिंग साठी सगळेच कलाकार १२ तास सेटवर असतात जणू सेट हेच त्यांचे दुसरे घर बनलेले असते. त्यांचे सहकलाकार, दिग्दर्शक, मेक अप दादा या सगळ्यांशीच खूप छान नात असत. पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे कलाकारांची मेक अप रूम जी त्यांच्यासाठी खूप स्पेशल असते. ज्या रुममध्ये सकाळी आल्यापासून ते packup होईपर्यंत रहातात. आपला अर्ध्याहून अधिक वेळ ते याच रुममध्ये असतात. आणि आपल्या लाडक्या तीतीक्षाने तिची मेक अप खूपच सुंदररीत्या paint केली आहे.
अतिशय सुंदर अशी भिंत या मुलींनी रंगवली असून त्या मागचा विचारदेखील खूप छान आहे अस म्हणायला हरकत नाही.