‘फक्त मराठी’ वर ‘सदाबहार’ चित्रपटांची मेजवानी

खिळवून ठेवणारे कथानक, उत्तम दिग्दर्शन आणि त्याला अफलातून अभिनयाची साथ असणारे कसलेले कलावंत यांची भट्टी जमून आली की ती चित्रकृती नक्कीच वेगळी ठरते. अशा प्रकारे तयार झालेले दर्जेदार चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही. अशा ‘सदाबहार’ मराठी चित्रपटांचा नजराणा ‘फक्त मराठी’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. ‘फक्त मराठी’ वाहिनीवर येत्या ११ मार्च ते १७ मार्च दरम्यान सायंकाळी ५:०० वा. हे गाजलेले सुपरहिट चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
या ‘सदाबहार’ सिनेमांमध्ये ‘फटाकडी’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘मोसंबी नारंगी’, ‘भन्नाट भानू’, ‘भिंगरी’, ‘गल्ली ते दिल्ली’, ‘गुलछडी’ या दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. ‘फक्त मराठी’च्या विविधरंगी कार्यक्रमांप्रमाणेच त्यांच्या ‘सदाबहार’ चित्रपटांना देखील रसिक प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील.

Subscribe to receive free email updates: