रणविजयला गायब करण्यात सिद्धेश्वरीचा हात तर नाही ना ?
मुंबई १ मार्च, २०१७ : कलर्स मराठीवरील सख्या रे मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. समीर आणि रणविजय या दोन सारख्या चेहऱ्यांच्या व्यक्तीने निर्माण झालेले संशयाचे वलय प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे यात वाद नाही. अत्यंत कुशलतेने समीर आणि रणविजयचे पात्र मालिकेमध्ये रेखाटण्यात आले आहे. आता हा नक्की समीर आहे कि रणविजय हे तर तुम्हालाच मालिका बघितल्यावरच कळेल. आता या सगळ्या गोंधळामध्ये प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला या मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या पात्राच नाव आहे “सिद्धेश्वरी”, हे पात्र आपल्या चौफेर अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहे.
सिद्धेश्वरी म्हणजे मालिकेमधील रणविजयची काकू. बराच काळ बाहेर राहिल्यानंतर आता सिद्धेश्वरी पुन्हा जहागीरदार यांच्या वाड्यावर आली आहे. रणविजय अचानक लग्नाच्या दिवशी गायब झाला आहे आणि तो आज पर्यंत सापडलेला नाहीये. हि बातमी सिद्धेश्वरीला कळताच ती वाड्यावर येण्याचा निर्णय घेते. जहागीरदार यांच्या संपत्तीवर आणि वाड्यावर तिचा डोळा आहे. रणविजय च वाड्यावर नसण्याचा फायदा घेऊन जहागीरदारांच्या वाड्यावर सत्ता गाजविण्याच्या हेतूने ती वाड्यावर आलेली आहे. पण प्रियंवदा तिच्या या हेतूला पूर्ण होऊ देईल ?
ती सिद्धेश्वरीच्या मार्गामध्ये कुठले अडथळे निर्माण करेल ?
तसेच रणविजयला गायब करण्यामध्ये सिद्धेश्वरीचा तर हात नाही ना ?
सिद्धेश्वरीच्या येण्याने मालिकेला कुठले नवे वळण येणार, समीर – रणविजयच्या मागचं गुपित... या आणि अश्या अनेक प्रश्नांची रंजित उत्तर मिळवण्यासाठी बघत रहा ‘सख्या रे’ हि मालिका फक्त कलर्स मराठीवर.
Related Posts :
Vidya Balan on the Firstpost Show: On crazy fans, funny narrations, and little-known truthsThe latest episode of The Firstpost Show features Vidya Balan, who is busy promoting Kahaani 2, releasing on 2 December 2016
The post Vidya … Read More...
… Read More...
Obituary - AB Mathur former Chief Engineer, AIR
We regret to inform that Mr Anand Behari Mathur, former Chief Engineer, All India Radio left for his heavenly abode on 28th November, 201… Read More...
English Singer Ellie Goulding Stills In White Dress
… Read More...
China revises rules for radio operations
China has released revised regulations covering the management of radio frequencies, stations, transmission equipment and radio operations … Read More...