वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या माध्यमातून मनोरंजक चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या झी टॅाकीजने येत्या रविवारी १८ जूनला ‘सांगतो ऐका’ या धमाल चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे. रविवारी दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. या चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता यईल.
प्रत्येकामध्ये एक हिरो दडलेला असतो, फक्त आपल्याला त्याला शोधता आले पाहिजे या संकल्पनेवर आधारलेला ‘सांगतो ऐका’ हा सिनेमा प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करतो. या चित्रपटात सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत आहे. सचिन पिळगावकर हे नेहमीच प्रयोगशील राहिले आहेत, मग ते निर्मिती, दिग्दर्शन असो किंवा अभिनय, नृत्य संगीत असो! चित्रपटसृष्टीतील असंख्य दिग्गजांसोबत सचिनजीनी काम केले आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सचिनजीनी ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात एका अनोख्या सोंगाड्याची भूमिका साकारली आहे.
आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं की, आपण सांगतोय ते लोकांनी एकदा तरी ऐकलं पाहिजे, यावर आधारित ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात सचिन पिळगावकर यांच्या सोबत संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, मिलिंद शिंदे, वैभव मांगले, भाऊ कदम, विजय चव्हाण, जगन्नाथ निवंगुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. सर्वसामान्य माणूस असामान्य परिस्थितीत काय करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. ‘सांगतो ऐका’ प्रेक्षकांसाठीमनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.
प्रसारण - झी टॅाकीजवर रविवार १८ जून दुपारी १२.०० व सांयकाळी ७.०० वा.