श्री साई सेवक संमेलन बातमी (SSST SHIRDI) - SAI SEVAK SCHEME


शिरडी-
        श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी येणाऱ्या पदयात्री साई पालख्‍यांच्या प्रतिनिधींच्या श्री साई सेवक संमेलनात साई सेवक योजनेसाठी 532 गटांनी नांव नोंदणी केली असून या साई सेवकांनी साईभक्त हा भगवंताचे रुप समजून त्यांची सेवा करावी असे आवाहन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी केले.
शिर्डी येथील सिध्द संकल्प मॅरेज हॉल येथे आज पार पडलेल्या श्री साई सेवक संमेलनात डॉ.हावरे बोलत होते. या प्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके, कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पदयात्री साई पालख्यांच्या प्रतिनिधींच्या या श्री साई सेवक संमेलनास ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी डॉ.हावरे म्‍हणाले, शेवगांवच्या शिवशंकर भाऊ पाटील यांचे आशिर्वाद घेवून  शेगांवच्या सेवेकरी योजनेच्या धर्तीवर साईसेवक योजना राबविण्यात येणार असून श्री साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणे व भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात येत आहे. पालखी सोबत येणा-या पदयात्री भाविकांना साईसेवक हा सन्मान देण्याचा आणि साईंची सेवा करण्याची संधी या माध्यमातून दिली जाणार आहे. या साई सेवकांचा 21 व्‍यक्‍तींचा 01 गट तयार करण्यात आला असून रविवार ते शनिवार 01 गट काम करेल असे एका आठवडयात 6 ते 2 व 2 ते 10 यावेळेत प्रत्येकी 5 याप्रमाणे 10 गटातून 210 साई सेवक आठवडाभर सेवा देतील. ही योजना 29 जुलै 2017 पासून सुरु करण्यात येईल. आजचा दिवस ऐतिहासिक असून या उपक्रमाची मुहुर्तमेढ आज 532 गटांची नोंदणी होवून रोवली आहे. या गटांना मंदिर, प्रसादालय, हॉस्पिटल व निवासस्थाने याठिकाणी वर्षातून सलग 7 दिवस साई सेवेची संधी दिली जाईल. साई सेवकांनी सेवाभावी वृत्तीने भक्तांचा आदर करुन, सन्मान करुन “ओम साई राम” म्हणून साईभक्तांच्या अडचणी सोडावयाच्या आहे. या साई सेवकांना ओळखपत्र, गणवेश देवून त्यांची संस्‍थानच्‍या वतीने निवास, भोजन, नाष्‍टा व चहापाण्‍याची व्‍यवस्‍था मोफत करण्‍यात येईल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या साई सेवकांनी स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून त्यांना व्यसनमुक्तीची शपथही दिली जाईल.
या प्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले व विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके यांची भाषणे झाली. तसेच साई पालख्यांच्या प्रतिनिधींनी आपली मते व्यक्त केली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 5 साई सेवकांना साई सेवक नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले तर आभार उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर यांनी मानले.         
SHIRDI -
              The SAI SEVAK SCHEME being implemented on behalf of the Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi has received an overwhelming response and 532 Groups have registered for the same. This was disclosed by Chairman of Shri Saibaba Sansthan Dr. Suresh Haware at the gathering of walking Sai Palakhi representatives arriving for Darshan of Shri Saibaba Samadhi at Shirdi. Dr. Haware has appealed to these SAI SEVAKs consider Sai devotees as incarnation of God and serve them in the best manner.
              He was speaking at the SAI SEVAK Gathring held at Siddha sankalp Marriage Hall, Shirdi. On this occasion Vice Chairman of the sansthan Chandrashekhar Kadam, Trustees S/Shri. Bhausaheb Wakchoure, Sachin Tambe, Pratap Bhosle, Trustee and Chairman Municipla Council Mrs. Yogitattai Shelke, Executive Officer Shrimati Rubal Agrawal and others were present. The SAI SEVAK gathering of the representatives of Padayatri Sai Palkhis arriving from all corners of the Nation and the State received an impeccable historic response.
              On this occasion Dr. Haware said that receiving the blessings from Shivshankar Bhau Patil from Shegaon, the SAI SEVAK Scheme will be implemented on the basis of Sevekari Scheme being implemented at Shegaon. The scheme is being implemented in order to enhance the service attitude at Shri Saibaba Temple and so that the devotees receive service based treatment. Through this medium this honor as SAI SEVAK will be provided to the Padayatri devotees arriving with Palkhi and they will get a chance to serve Shri Sai. Each group of 21 persons has been created. 01 Group will work from SUNDAY to SATURDAY. In a week 5 groups will work in two shifts of 6 to 2 and 2 to 10. This way, a total of 210 SAI SEVAK will provide service for a week. The Scheme will start from 29th JULY 2017. Today is a historic day and the initiative has come to life with 532 groups registering for this service. These groups will be placed for service at various locations such as Temple, Prasadalaya, Hospital and residences and will be provided opportunity of Sai service for 7 days at a stretch. The SAI SEVAKs should work with service in their minds honoring devotees and felicitating them with the words of “OM SAI RAM” to see that difficulties of Sai devotees are resolved. The SAI SEVAKs will be provided with Identity Cards and Uniforms and the arrangements for their stay, food, breakfast and tea will be made FREE OF CHARGE on behalf the Sansthan. It is essential that all SAI SEVAKS should follow cleanliness. They will be given an oath to be free from vices.
             Vice Chairman of the Sansthan, Chandrashekhar Kadam, Trustees S/Shri. Bhausaheb Wakchoure, Sachin Tambe, Pratap Bhosle and Trustee and Chairman, Municipla Council Mrs. Yogitatai Shelke also spoke on the occasion. Representatives of Sai Palkhis expressed their opinions. On this occasion 5 SAI SEVAKS were given SAI SEVAK REGISTRATION CERTIFICATES in representative manner. Executive Officer Shrimati Rubal Agrawal presented introductory remarks and vote of thanks was proposed by Dr. Sandeep Aher, Dy. Executive Officer.

Subscribe to receive free email updates: