फक्त मराठी वाहिनी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी दर्जेदार मराठी चित्रपटांचा खास नजराणा घेऊन येत असते. कथा-विषय, कलाकारांची अदाकारी आणि उत्तम दिग्दर्शन यांची भट्टी जमून आली की चित्रकृती नक्कीच वेगळी ठरते. चित्रपटगृहात ब्लॉकबस्टर ठरलेल्या काकण या अशाच हटके कलाकृतीचा आस्वाद येत्या रविवारी १३ ऑगस्टला सकाळी ११.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. फक्त मराठी वाहिनीवर घेता येईल.
काकण ही प्रेमकथा असून या चित्रपटात जितेंद्र जोशी व उर्मिला कानेटकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. कोकणातल्या एका गावातल्या गरीब मच्छीमार असलेल्या किशूची (जितेंद्र जोशी)ची ही कथा. त्याचं वसुमती (ऊर्मिला कानेटकर) हिच्यावर विलक्षण प्रेम असतं. ती गावातल्या श्रीमंत जमीनदाराची मुलगी असते. साहजिकच या प्रेमाला तिच्या वडिलांचा विरोध असतो. त्यानंतर काय घडतं? ते आयुष्यात कधी भेटतात का? याची हृद्यस्पर्शी कथा म्हणजे काकण चित्रपट.
कौटुंबिक मनोरंजनासोबत प्रेमकथेचा विलक्षण अनुभव देणारा काकण रविवार१३ ऑगस्टला सकाळी ११.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. फक्त मराठी चित्रपट वाहिनीवर अवश्य पहा.