तुमच्याही आयुष्यात होऊ दे खेळाचा श्रीगणेशा - अमृता फडणवीस यांचा सल्ला

खेळ... लहान मुलांच्या आवडीचा विषय... बालपण हातातून निसटत जातं तसा हा आवडीचा विषय मागे पडत जातो. मात्र हा विषय मागे पडू न देता कुठल्याही वयात मनसोक्त खेळणं महत्वाचं असल्याचं म्हणत खेळण्याने आयुष्य शिस्तबध्द होत असल्याचं अमृता फडणवीस म्हणतात. 
आपल्या याच वक्तव्याला साजेशी कृती करत प्रत्येक खेळाचं समर्थन करताना त्या दिसतात. खेळांना प्रोत्साहन देणारी कित्येक मंडळी सध्या कबड्डी या खेळाला प्रोत्साहन देताना दिसतात. प्रो – कबड्डी लीग च्या निमित्ताने कबड्डी या खेळासाठी लोकांमध्ये आवड निर्माण झाली आहे. हीच आवड कायम राहावी म्हणून स्वतः टेनिसपटू असणा-या अमृता फडणवीस सध्या सुरु असलेल्या प्रो - कबड्डी लीगमध्ये राष्ट्रगान करणार आहेत. आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनादिवशीपासून मुंबईत खेळवल्या जाण-या या सामन्यांचा श्रीगणेशा अमृता फडणवीस यांच्या आवाजातील राष्ट्रगीत गायनाने होणार आहे.
सध्या बँकींग क्षेत्रात कार्यरत असणा-या अमृता फडणवीस आपल्या शालेय जीवनात राज्यस्तरीय टेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राज्यस्तरीय अंडर 16 टेनिससाठी योगदान दिलं होतं. त्यानंतरही खेळाचं महत्त्व जाणून वेगवेगळ्या खेळांना त्यांनी वेळोवेळी समर्थन दिलं आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनतर्फे पुण्यात झालेल्या डेविस चषकासाठी भारत आणि न्यूझिलंड संघात झालेल्या सामन्यासाठी अमृता फडणवीस चीफ पॅट्रन होत्या तर 2018 मध्ये होणाऱ्या टेनिसच्या सामन्यांसाठी त्या महिला टेनिस संघाच्या चीफ पॅट्रन झाल्या आहेत.
मैदानी खेळांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून आपल्या आयुष्याचं सोनं करा... तुमच्याही आयुष्यात होऊ दे खेळाचा श्रीगणेशा असा सल्ला हल्लीच महिला टेनिस संघाच्या चीफ पॅट्रन झालेल्या अमृता फडणवीस यांनी दिला.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :