वर्षानुवर्षे रसिकांच्या मनात रुंजी घालणारी हिंदी चित्रपटातील असंख्य लोकप्रिय गीते देव आनंद व शम्मी कपूर या दोन अभिनेत्यांवर चित्रित झाली आहेत. यातील काही सदाबहार गाणी रसिकांना यावेळी पडद्यावर पहाता येणार आहेत. सोबत ज्येष्ठ पत्रकार व सिनेअभ्यासक अंबरीश मिश्र हे या दोन्ही रंगतदार व्यक्तिमत्वांचे पैलू व किश्श्यांचा खजिना यावेळी उलगडणार आहेत. हा कार्यक्रम सशुल्क असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ आहे. काही जागा राखीव आहेत. प्रसाद फणसे व नवरस आर्ट अॅकॅडमी यांचा रंगरसीले हा कायर्क्रम रसिकांना निखळ आनंद देईल हे नक्की.