सरस्वती मालिकेमधील सर्जेराव चौधरीची एन्ट्री !

मुंबई १५ डिसेंबर२०१६ : “तुम्ही बोलायचं ... आणि आम्ही ऐकायचं” कुठे तरी ऐकल्यासारख वाटत आहे नानेगेटिव्ह असूनही प्रेक्षकांचे लाडक असलेल पात्र म्हणजेच सरस्वती मालिकेमधील सर्जेराव चौधरी ह्याला तुम्हाला परत बघायला मिळणार आहे पण एका नवीन रुपामध्ये सरस्वती मालिकेमध्ये. हो ! सर्जेराव चौधरी परतले आहेत. संग्राम साळवी ह्याच्या लुक मध्ये बराच बदल करण्यात आला आहे. त्याचेcostumes आणि hair style मध्ये बरेच बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही आता सर्जेरावांना पाहिलं तर तुम्हाला त्याची style नक्कीच बदलेली जाणवेल. काही दिवस मालिकेपासून दूर असूनही सर्जेराव म्हणजेच संग्राम साळवीची लोकप्रियता कमी झालेली नाही. मालिकेमध्ये महत्वपूर्ण अशी भूमिका संग्राम याने निभावली असून तो परत आल्यावर प्रेक्षकांना देखील आनंद होणार आहे हे नक्की.
सरस्वती आणि मोठे मालक म्हणजेच राघव यांचा संसार उधवस्त करण्याचा त्याचा हेतू अजूनही कायम आहे. त्याच्या कपटी आणि कारस्थानी विचारसरणीत काडीमात्रहि बदल झालेला नाहि. पण याचा सरस्वती आणि राघव यांच्या नुकत्याच सुरळीत सुरु झालेल्या जीवनात काय बगल होईल ? काय अघटीत घडेल ?सर्जेराव आता कुठला नवीन डावपेच डोक्यातून ठेऊन आले आहेत हे तुम्हाला मालिका बघितल्यावरच कळणारा आहे.   

Subscribe to receive free email updates: