आजची तरुणाई आणि झी युवा यांचे एक अतूट नाते आहे. जिथे तरुणाई असेल, उल्हास असेल, आनंद असेल , मजामस्ती असेल ,धमाल असेल आणि तिथे झी युवा नसेल असे कसे होईल .केळकर कॉलेजच्या डायमेन्शन या कॉलेज फेस्टिवल मध्ये झी युवाच्या फ्रेशर्स , युवा गिरी आणि लव लग्न लोचा या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती . या मंडळींनी नुसतीच हजेरी नाही लावली तर कॉलेजच्या तरुणाई बरोबर त्यांनी या फेस्टिव्हलची संपूर्ण मजाही लुटली. विद्यार्थाना अभ्यासाव्यतिरक आकर्षण असतं ते म्हणजे त्यांच्या फेस्टिवलच. फेस्टिवल म्हंटल कि विद्यार्थ्यांच्या जीव कि प्राण. आणि त्यात मग वेगवेगळ्या स्पर्धा आणि बरंच काही. झी युवाच्या फ्रेशर्स मालिकेतील रेणुका, मनवा आणि सम्राट, लव्ह लग्न लोचा मालिकेतील शाल्मली आणि अभिमान तर युवागिरीमधील अपूर्व रांजणकर आणि स्नेहा चव्हाण या सर्वानी या फेस्ट मध्ये अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला , कॉलेज बँड चा बसून आणि त्यात भाग घेऊन धमाल केली . ग्राऊंड वर सुरु असलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्याच प्रमाणे ऑडीटोरीयम मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या झी युवाच्या प्रवासाबाद्ल सुद्धा सांगितले. कलाकारांचं फेम आणि त्या मागची मेहनत या बद्दलही मुलांना माहिती दिली . झी युवाच्या कलाकारांना या फेस्टमुळे स्वतःच्या कॉलेजचे डे आठवले.
Did you know we featured more than 400 creative projects on the WeTransfer wallpapers in 2016? Find out which were the most popular in our review of the year, This Worked.