मुंबई २ डिसेंबर, २०१६ : कलर्स मराठीवरील कमला मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला आणि प्रेक्षकांची मने जिंकलेला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी आता पुन्हा एकदा चाहूल मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षरचा या मालिकेमधील लुक खूपच वेगळा आहे, आणि तो प्रेक्षकांना आवडतो आहे. यामध्ये अक्षर तरुण, परदेशातून शिकून नुकताच भारतात आलेला मुलगा असा रोल निभवणार आहे. त्याच्या लुकपासून ते त्याच्या डायलॉगपर्यंत त्याने प्रचंड मेहेनत घेतली आहे. या रोलसाठी त्याने केसांचे strething केले आहे, वजन कमी केले आहे, दाढी काढली आहे, एकंदरीतच त्याचा मालिकेमध्ये casual लुक असणार आहे.
कमलामध्ये अक्षरने एका प्रगल्भ विचारांचा, अहंकारी, संसारी, परीस्थीतीला हताश न होणाऱ्या पत्रकाराचा रोल साकारलेला होता, पण चाहूल या मालिकेमध्ये तो नुकताच शिकून आलेल्या स्वप्नाळू मुलाचा रोल साकारत आहे, त्यामुळे कमलामधील देव आणि चाहूलमधील सर्जेराव ह्या दोन्ही रोलमध्ये फरक दाखवण खूप कठीण होत. या बद्दल बोलताना अक्षर म्हणाला, “कमलामधील देव आणि चाहूलमधील सर्जेराव हे दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्व आहेत. कमला मालिकेतील देव हा विचारी, dominating, egoistic असा होता आणि सर्जेराव हे खूप हलकफुलक, स्वप्नाळू अस पात्र आहे. त्यामुळे हा फरक दाखवण आव्हान होतं. त्यामुळे बऱ्याचप्रकारचे बदल लुकमध्ये करण्यात आले. जवळपास २ महिने मी डायट वर होतो आणि तब्बल १२ ते १३ किलो इतक वजन कमी केलं, जे या रोलसाठी गरजेच होत. दुसरी गोष्ट म्हणजे, मी पहिल्यांदाच एका हॉरर मालिकेमध्ये काम करतो आहे त्यामुळे माझ्यासाठी हा खूप वेगळा अनुभव असणार आहे. मी कॉलेजमध्ये असताना मला लुक बदलण्याची सवय होती मला नवीन लुक्स ट्राय करायला खूप आवडत त्यामुळे कलर्स मराठीने वाहिनेने मला चाहूल मध्ये हि संधी दिली आणि ती मी स्वीकारली मीमला नवीन मला अपेक्षा कि माझा नवीन रोल आणि लुक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”.