सरस्वती मालिकेमध्ये मिळाले सरस्वतीला मोठ्या मालकांकडून गिफ्ट ! सरस्वतीला मनवण्याचा मोठ्या मालकांचा हटके अंदाज ...

मुंबई१४ डिसेंबर२०१६ : सरस्वती मालिकेमध्ये अचानक सारा आल्यामुळे बरचसे तणावाचे वातावरण होते. आता सारा सरस्वतीला राघवपासून दूर करण्याचा प्रयत्न करेल कि तिला सरस्वती मुळात कशी आहे हे कळल्यावर सारा बाजूला होईल? राघवच्या मनात असलेल्या भोळ्या-भाबड्या आणि त्याच्या मनापासून प्रेम करणाऱ्या सरस्वतीच काय होईल ऑस्ट्रेलिया वरून आलेली सारा सरस्वतीची जागा कधी घेऊ शकेल?सरस्वतीला आपण सारा पेक्षा कुठे कमी तर नाही ना पडत आहे काय होईल पुढे सरस्वती कोणता मार्ग अवलंबेलया न्यूनगंडातून बाहेर येण्यासाठी काय करेल सरस्वती ह्या सगळ्या प्रश्नांना आता पूर्णविराम लागला आहे. कारण सत्य आता सगळ्यांनाच कळले आहे. 
सरस्वतीमध्ये सत्य समोर आल्याकारणाने सगळ निवळल असल तरी सुध्दा सरस्वती जरा नाराजच आहे. सरस्वतीने सारा हिला चांगलाच धडा शिकवला आणि घरातून बाहेर जाण्यास भाग पाडले आणि ती बाहेर गेली देखील. पण आता सरस्वतीचा बिघडलेला मूड निट करण्यासाठी मोठे मालक बरेच प्रयत्न करत आहेत असे दिसून येत आहे. बायकोचा मूड खराब झाला कि तिला मनवण किती कठीण असत हे एखादा नवराच सांगू शकतो वा त्यालाच कळू शकत. सरस्वती प्रिय असलेली ठमी मोठे मालक म्हणजेच राघव तिला भेट म्हणून देणार आहे. तसेच मोठ्या मालकांनी सरस्वतीसोबत ठमीवर बसून एक राउंडदेखील मारला. सायकल ह्या सारख अनोख गिफ्ट सरस्वतीला दिलं आहेजे सध्य स्थितीला अनुसरून आहे आणि योग्य देखील आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी दुचाकीचा वापर करावा हा संदेशच यातून प्रेक्षकांना दिला आहे अस बोलायला हरकत नाही. तसेच सरप्राईझ म्हणून लाल गुलाबांचा गुच्छ देखील दिला. आता पुढे काय होईल हे तुम्हाला लवकरच कळेल.
तेंव्हा बघत रहा तुम्हची आवडती मालिका सरस्वती फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: