प्रचिती जी अवघ्या ५ वर्षांची आहे तिने तिन्ही परीक्षकांना वेड लावल. तिच्या डांस मूव्हज, चेहऱ्यावरील हावभाव, स्टेप्स आणि तीच बोलण हे सगळच परीक्षकांना भावल. तिने डांस सुरु करताच परीक्षक थक्क झाले,
आपण आजकल अनेक डांस शोजमधून महराष्ट्रात तर काय संपूर्ण भारतामधील कलाकारांकमध्ये असलेले अद्वितीय असे talent बघतो. आणि तसच काहीस 2 MAD च्या मंचावर देखील झालं. ऑडीशन सुरु असताना अवघ्या ५ वर्षाची चिमुकली मंचावर आली आणि तिने तिन्ही परीक्षकांना उभ राहून टाळ्या वाजविण्यास आणि मंचावर येऊन तिच्याबरोबर स्टेप्स करण्यास भाग पडले. या चिमुकलीच्या एनर्जी, अदाकारीचे आणि निरागसतेचे परीक्षक FAN तर झालेच पण ती परीक्षकांची फेवरेट सुध्दा झाली. संजय जाधव तर तिला घरी घेऊन जायला तयार होते इतकी ती त्यांना आवडली. तर हि चिमुकली 2 MAD च्या अंतिम सोहळ्यात एका नृत्याचे सादरीकरण करणार असे देखील संजय जाधव म्हणाले. उमेश जाधव यांनी प्रचीती म्हणजे 2 MADला मिळालेले अनमोल रत्न आहे असे म्हणाले आणि तिच्याबरोबर सेल्फीदेखील काढला. इतक्या लहान वयामध्ये नृत्याबद्दलची जाण हे खरच उल्लेखनीय आहे हात वाद नाही. अमृता खानविलकरने या चिमुकली बरोबर दोन स्टेप्सदेखील केल्या.
असेच भरपूर डांस तुम्हाला बघायला मिळणार आहेत 2 MAD - महाराष्ट्राचा अस्सल डांसर या कार्यक्रमामध्ये. तेंव्हा बघायला विसरू नका ९ जानेवारी पासून 2 MAD फक्त कलर्स मराठीवर सोम- आणि मंगळ रात्री ९.३० वाजता.