या मंचावर अनेक चिमुकले मुल मुली आले ज्यांनी परीक्षकांची मने जिंकली आपल्या हटके डांस स्टाईल ने तर आपल्या दिलखेचक अदांनी आणि काहींनी तर चक्क आपल्या मनातील इच्छाच पूर्ण केल्या. परीक्षकांप्रमाणेच ते प्रेक्षकांची मने देखील नक्कीच जिंकतील यात शंका नाही. पुण्यातला श्री दळवी या फक्त १२ वर्षाच्या मुलाने अमृता हिला प्रोपोज केले. श्री दळवीतील निरागसता आणि नृत्य याच्या प्रेमात परीक्षक पडले. डांस ऑडीशन दरम्यान त्याने संपूर्ण डांस अमृताकडे बघून केला आणि जेंव्हा उमेश जाधव यांनी त्याला विचारले कि, तू अस का केले तेंव्हा त्याने अतिशय निरागस रीत्या अमृताला प्रोपोज केले तो म्हणाला “तू मला लय आवडते” आणि त्यावर अमृता देखीलI Love you too म्हणाली आणि त्याच्या बरोबर डांस देखील केला. उमेश जाधव यांनी त्याला आपल्या अंदाजात comments देखील दिल्या.
आम्हाला खात्री आहे श्री दळवीचा आणि तुषारचा भन्नाट डांस तुम्हाला देखील आवडेल. तेंव्हा महाराष्ट्रातील असे भन्नाट डांस आणि talent बघण्यासाठी बघा 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर फक्त कलर्स मराठीवर सोम आणि मंगळ रात्री ९.३० वाजता.