मोनाली ठाकुर गाणार कलर्स मराठीवरील “सख्या रे” मालिकेचे शीर्षक गीत “मोनाली ठाकुरचे पहिले मराठी गाणे”


मुंबई२ जानेवारी २०१७ : मोह मोह के धागेसवार लू अस म्हणत संपूर्ण भारताला वेड लावणारी गायिका मोनाली ठाकूर आता मराठी गाण्याकडे वळली आहे. मोनालीच्या आवाजातील मधुरतेने प्रेक्षकांच्या मनात एक अबाधित स्थान बनवले आहे. हिंदी सिनेमासृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायल्यानंतर मोनाली आता मालिकेकडे वळली आहेते पण हिंदी नव्हे तर मराठी. मोनाली  लवकरच कलर्स मराठी वरील सख्या रे या मालिकेचे शीर्षक गीत गाणार आहे. आजकल हिंदी सिनेमासृष्टी धील बरेचसे गायक मराठीतील शीर्षक गीतांना आवाज देत आहेत. जसे काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीवरील चाहूल या मालिकेचे शीर्षक गीत हे शाल्मली खोलगडे हिने गायले होतेजे प्रेक्षकांच्या खास पसंतीस देखील उतरले होते.
सख्या रे हि मालिका कलर्स मराठीवर ९ जानेवारीपासून सोम ते शनी रात्री ९ वाजता बघायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये प्रेक्षकांना त्यांचा लाडका अभिनेता सुयश टिळक,रुची सवर्ण आणि निवोदित ज्ञानदा रामतीर्थकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी हे प्रमुख भूमिकेत दिसतील. तेंव्हा बघायला विसरू नका सख्या रे ९ जानेवारीला  ज्यामध्येतुम्हाला हे गाणं पहील्यांदा ऐकायला देखील मिळणार आहे. आम्हाला खात्री आहे कि,प्रेक्षकांना मोनाली ठाकूर हिच्या आवाजातील हे गाण देखील नक्कीच आवडेल. 

Subscribe to receive free email updates: