झी युवावर "बँजो "चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

नवे पर्व युवा सर्व “ म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहिनी झी युवा , सांगीतिकसिनेमा ‘बँजोचे येत्या रविवारी दिनांक  जानेवारीला संध्याकाळी  वाजता , वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरदाखवण्यासाठी सज्ज झाली आहेरितेश देशमुख आणि नर्गीस फाकरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बँजो’ हाराष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा पहिलाच हिंदी सिनेमा आहेया सिनेमात महाराष्ट्रातीलनामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सांगीतिक वाद्याचे – ‘बँजोचे चित्रण करण्यात आले आहे.सिनेमातमुंबईच्या वंचित समाजात राहणा-या चार बँजोवादकांची गोष्ट पाहायला मिळतेज्यांना क्रिस्टिनाच्या नावाच्या(नर्गीस फाकरीअमेरिकेहून आलेल्या संगीतकार मुलीच्या रूपाने एक सुवर्णसंधी मिळतेया संधीत लपलेले आव्हानबँजो’ पेलू शकणार काहे पाहण्यासाठी चित्रपट पहावाच लागेल.
बालक-पालकया सुपरहिट चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेतारितेश देशमुख ही जोडी पुन्हा या चित्रपटाने एकत्र आली .  सिनेमाच्या संकल्पनेविषयी रवी जाधव म्हणाले , ‘मीनटरंग सिनेमावर काम करत होतो तेव्हापासून म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून बँजोचा विषय माझ्या डोक्यात घोळतहोतामला भारतातील रस्त्यांवरच्या कलाकारांसाठी काहीतरी करायचे होतेकारण त्यांना त्यांची गुणवत्ता सादरकरण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही आणि पयार्याने त्यांच्या कलेला आदरही मिळत नाहीआपण जॅझ आणि हिप-हॉपबद्दल सतत बोलतोपण हे प्रकारही स्ट्रीट आर्टचाच एक भाग आहेत आणि काही महान पॉप स्टार्सहीरस्त्यावरूनच शिखरावर पोहोचले आहेतमला लक्षात आले कीबऱ्याच लोकांना ‘बँजोवाद्य किंवा बँजोकलाकारांबद्दल काहीही माहिती नाही.’
सिनेमात बँड नायकाची भूमिका करणारा रितेश देशमुख म्हणाला, ‘बँजो या स्ट्रीट आर्ट प्रकाराला आदरमिळवून देण्याचा हा प्रयत्न आहेहा सिनेमा रस्त्यावरचे सर्व कलाकारत्यांचा संघर्ष आणि त्यांच्या भावनांचेप्रतिबिंब आहे.’
या सिनेमात तराट (रितेश देशमुख), ग्रीस (धर्मेश येलांडे), पेपर (आदित्य कुमारआणि वाज्या (राम मेननया चारबँजो वादकांची कहाणी पाहायला मिळणार आहेजे मुंबईच्या निम्न वर्गात राहात असतात आणि अमेरिकेतराहाणाऱ्या क्रिस्टिनाच्या (नर्गीस फाख्रीरुपाने त्यांना त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी मिळते...

Subscribe to receive free email updates: