ज्येष्ठ दिग्दर्शक दासबाबू यांची हिंदी अभ्यास समितीवर निवड

ज्येष्ठ अनुभवी दिग्दर्शक दासबाबू यांची मुंबई विदयापीठाच्या हिंदी विषयाचा सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. हिंदी विभाग पाठ्यक्रम समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत त्याविषयीचा ठराव संमत करण्यात आला. त्यानुसार तृतीय वर्ष हिंदी विषयाचा सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये ज्येष्ठ अनुभवी दिग्दर्शक दासबाबू यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मनोरंजनासोबत वैचारिक संदेश हे दासबाबू यांच्या आजवरच्या मालिका आणि चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. दिग्दर्शक दासबाबू यांनी लढा’, ‘श्रीमंताची लेक’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘वाजवा रे वाजवा’ ‘आई’, ‘फक्त तुझ्याचसाठी’, एक धागा सुखाचा, ‘मित्रा याला जीवन ऐसे नाव’ यासारख्या अनेकवैविध्यपूर्ण मराठी मालिकांसोबत तहान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेनिर्माते सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस व संतोष यशवंत मोकाशी निर्मित ब्रेव्हहार्ट’ हा दासबाबू यांचा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच अनेक चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचीनिवड होऊन प्रेक्षकांसह समीक्षकांनीही ब्रेव्हहार्टचे विशेष कौतुक केले आहे. अशात त्यांची मुंबई विदयापीठाच्या सुधारित हिंदी अभ्यासक्रम समितीवर झालेली निवड नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील मानाच्या घटनांमध्ये या निवडीचा समावेश असून मुंबई विदयापीठाने दाखविलेला हा विश्वास नक्कीच मी जबाबदारीने पूर्णत्वास नेईन, असा विश्वास दिग्दर्शक दासबाबू यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

Subscribe to receive free email updates: