नादब्रह्म परिवार आयोजित , अनाहत , पुणे निर्मित आणि सावनी रवींद्र प्रस्तुत , मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत-नाट्य महोत्सवाचे आयोजन येत्या ६ जानेवारी ला चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे.
या वर्षी संस्थेच्या स्थापनेस २६ वर्ष पूर्ण होत आहे. मासिक संगीतसभा, संगीतविषयक कार्यशाळा, अनाहत संगीत अॅकेडमीद्वारे संगीत प्रशिक्षण, संगीत संशोधन, मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच अभिनव कल्पनांवर आधारित कार्यक्रम या संस्थेच्या वतीने घेतले जातात. त्यानुसार यंदा २२ वा वार्षिक मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत-नाट्य महोत्सव संस्थेच्या वतीने घेण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वंदना घांगुर्डे यांनी सांगितली.
आजच्या पिढीची आघाडीची गायिका सावनी रवींद्र हिला गाण्याचे बाळकडू तिच्या आई बाबां , डॉ. वंदना व वडील डॉ. रवींद्र यांच्याकडूनच मिळालं . घरातच शास्त्रीय आणि नाट्यसंगीताच वातावरण होतंच.सावनीच्या आईबाबांना हे शिक्षण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाले होते . त्याच प्रमाणे सावनीला सुद्धा पंडितजींकडून शिकण्याचा मान मिळाला . या यावर्षी पंडित हृदयनाथ मंगेशकर ८० वर्षांचे होत असताना त्यांना आदरांजली देण्याच्या दृष्टीने गायिका सावनी रवींद्र ६ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता "स्वर हृदयांतरी " हा कार्यक्रम सादर करणार आहे आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमाला स्वतः पंडित हृदयनाथ मंगेशकर हजर असणार आहेत . या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंडितजी, त्यांचा आजवर संगीत क्षेत्रातील आलेला अनुभव आणि काही आठवणी प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत . पंडितजींची काही ठराविक गाणी सुद्धा आपल्याला त्यांच्या आवाजात ऐकायला मिळतील.
" होणार सून मी या घरची " मधील श्री आणि जान्हवीच प्रेमगीत , " नाही कळले कधी " या गाण्याने तरुणाईला अगदी वेड लावलं होत , तेव्हा प्रत्येकाच्या मनामनामध्ये सावनी रवींद्र ने घर केल . 'अजूनही' हा तिचा सोलो मराठी गीतांचा अल्बम आणि 'मेरे हिस्से का चाँद'मध्ये सावनीनं हिंदी-उर्दू गझल गायल्या . त्याच प्रमाणे .शब्दांचीच रत्ने आणि लताशा ' हे कार्यक्रम आणि 'आशाएँ' या अल्बमसह ती 'अजब लग्नाची गजब गोष्ट', 'ती रात्र', 'अजिंठा', 'कुणी घर देता का घर' केरी ऑन देशपांडे , वन वे तिकीट , पिंडदान यांसारख्या मराठी त्याचप्रमाणे तमिळ सिनेमांसाठीही गायली आहे आणि आणखी काही मोठे मराठी तसेच तमिळ सिनेमे प्रदर्शनासाठी तयार आहेत.