विविध मनोरंजक चित्रपटांची मेजवानी रसिकांना देणाऱ्या झी टॅाकीजने येत्या रविवारी बँजो या चित्रपटाची भेट रसिकांसाठी आणली आहे. रविवार १५ जानेवारीला सायं. ७.०० वा. बँजो सिनेमा झी टॅाकीज व झी टॅाकीज एचडीवरप्रथमच प्रसारित केला जाणार आहे.
परिस्थितीशी संघर्ष करत संगीतावर प्रेम करणाऱ्या बँजो वादकांची कथा दिग्दर्शक रवी जाधव यांनी बँजो चित्रपटामधून मांडली आहे. मुंबईच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या तराट (रितेश देशमुख), ग्रीस (धर्मेश येलांडे), पेपर (आदित्य कुमार) आणि वाज्या (राम मेनन) या चार बँजो वादकांची कहाणी पहायला मिळणार आहे, अमेरिकेत राहाणाऱ्या क्रिस्टिनाच्या (नर्गीस फाख्री) रुपाने त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी त्यांना मिळते… या संधीतले आव्हान ते पेलू शकतात का? याची रंजक कथा म्हणजे बँजो हा सिनेमा.
रस्त्यावर राहूनही आपल्यातील कलागुणांना जपत परिस्थितीशी झगडणाऱ्याबँजो कलावंतांचा प्रवास दाखवणाऱ्या बँजो चित्रपटाचा आस्वाद रविवार १५ जानेवारीला सायंकाळी ७.०० वा. झी टॅाकीज व झी टॅाकीज एचडीवर घेता येईल.