‘चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा माघी गणेशोत्सव ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने खवळे महागणपतीच्या महात्म्यावर आधारीत‘विघ्नहर्ता महागणपती’ या मराठी चित्रपटाचा भक्तीमय नजराणा ‘झी टॉकीज’ आपल्या प्रेक्षकांसाठी सादर करीत आहेत. येत्या रविवारी २९ जानेवारीला ‘झी टॉकीज’वर दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. ‘विघ्नहर्ता महागणपती’ हा चित्रपट पहाता येणार आहे.
'लिम्का बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड' मध्ये नोंद करण्यात आलेल्या कोकणातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी गावातील खवळे महागणपतीची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल. ३१४ वर्षांची परंपरा,२१ दिवसांचं वास्तव्य, तीन रूपांमध्ये दर्शन आणि वंशवृद्धी करणारा ‘श्री गणेश’ अशी या विघ्नहर्त्याची ख्याती आहे. समीर धर्माधिकारी, प्रिया मराठे, अलका कुबल-आठल्ये, शरद पोंक्षे, आशालता वाबगावकर, जयंत सावरकर, विजय चव्हाण, अनिरुद्ध हरीप, रूई जाधव आदी कलाकारांनी ‘विघ्नहर्ता महागणपती’ मध्ये भूमिका साकारल्या आहेत.
श्री गणेशाची महती, देवगडमधील निसर्गसौंदर्य आणि सुमधुर भक्तीगीतांचा आस्वाद घेण्यासाठी, रविवारी २९ जानेवारीला ‘झी टॉकीज’ वर दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. ‘विघ्नहर्ता महागणपती’ पहायला विसरू नका.