बन मस्का मध्ये घडतंय मुग़ल-ए-आज़म!!

बन मस्का मधील लाघवी मैत्रयी आणि मैत्रयीला समजून घेणारा संमजस सौमित्र हे बन मस्का या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ठय. मैत्रयी आणि सौमित्र यांच्याच होणाऱ्या हलक्या फुलक्या भांडणाच्या प्रेमात आज अख्खी तरुणाई आहे. प्रेम करताना मैत्रेयी सारखी गर्लफ्रेंड आणि सौमित्र सारखा बॉयफ्रेंड असेल तर आयुष्य कसं सेट असतं असे सर्व प्रेमी युगलांना वाटत असतं. पण जेव्हा अश्या प्रेमाला त्यांच्याच घरच्यांचा विरोध होतो तेव्हा मात्र आपलेच आई बाबा आपल्याला शक्ती कपूर शिवाय कमी वाटत नाहीत आणि मग सुरु होत घरातचं मुघलेआझम. आपल्या प्रेमाच्या नात्याला आपलेच घरचे विरोध करतात आणि मग एका वेगळ्याच प्रकारच्या युद्धाला सुरुवात होते आणि नंतर हे युद्ध कोणत्या पातळीला जाते हे कोणीही सांगू शकत नाही.
असंच काहीसं “मुघलेआझम "च वातावरण सध्या बन मस्का या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. पण या वेळी “सलीम” आहे मैत्रयी, “अनारकली” आहे सौमित्र आणि दोन “अकबर” आहेत ते म्हणजे मैत्रयीचे आई बाबा. झालय असं कि मैत्रेयी चे आई बाबा म्हणजेच अनघा - चिन्मयी सुमित आणि अभय हे दोघेही पेश्याने डॉक्टर आहेत. त्यांचं स्वतःच मुंबई मध्ये हॉस्पिटलही आहे. एकंदरीत मैत्रयीचं एक सुखवस्तू कुटुंब आहे. आपला सौमित्र सुद्धा डॉक्टर आहे पण होमिओपॅथीचा आणि मैत्रयीच्या आई बाबांच्या मते एवढं पुरेसे नाही आहे. त्यांनी मैत्रयीला अतिशय लाडाने वाढवलंय. प्रत्येक सुट्टीत त्यांनी मैत्रयीला परदेशात नेलंय. तिचा प्रत्येक महागडा हट्ट पुरवला आहे. मैत्रयीने बोलण्याची खोटी, तिला जे हवे ते तिच्या आई बाबांनी तिला आणून दिलंय. आणि त्यांच्या मते सौमित्रने होमिओपॅथी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो जास्त पैसे नाही कमाऊ शकणार आणि त्यामुळे मैत्रयीला तो खुश ठेऊ शकणार नाही.
त्यामुळेच त्यांनी सौमित्र ला नकार दिला. मैत्रयीला खरं तर यातील कोणत्याच गोष्टींची पर्वा नाही.  तिला केवळ सौमितशीच लग्न करायचे आहे ...येणाऱ्या भागात आपल्याला मैत्रयीतील "सलीम "जागाहोऊन आईबाबांच्या रूपातील अकबरशी युद्ध करेल कि नांगी टाकेल ... हि मजा बघण्यासाठी पहा बन मस्का रोज सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ८ वाजता केवळ झी युवावर.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :