मुंबई, ९ जानेवारी, २०१७ : कलर्स मराठीवरील सरस्वती मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. तितिक्षा तावडे म्हणजे तुमची लाडकी सरस्वती हि सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. सरस्वती मालिकेमध्ये सध्या सरू आणि राघवचे एक वेगळेच नाते बघायला मिळत आहे. सरस्वतीच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच घटना घडून गेल्या ज्याला सरस्वती खंबीरपणे सामोरी गेली. आता राघवदेखील तिच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे. सरस्वतीला खुश ठेवण्यासाठी राघव बरेच प्रयत्न करत आहे तसेच तिची खूप काळजी घेत आहे. सरस्वती मालिकेमध्ये सरू आणि मोठे मालक म्हणजेच राघव यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. सरस्वतीचा रुसवा घालविण्यासाठी मोठ्या मालकांनी अलीकडेच नवीन साड्या आणि गळ्यातला सुंदर नेकलेस देखील दिला होता. सरूलादेखील तो खूप आवडला आणि तिने ते घालून मोठ्या मालकांना म्हणजेच राघवला खुश देखील केले. नेकलेस आणि साडी इथपर्यंत सगळ छानच होत पण मोठ्या मालकांनी आता चक्क पोहे बनविण्याचा घाट घातला, हि सगळीच गंमत
आहे. त्याच झाल अस कि,सरस्वतीच्या पायाला दुखापत झाली आणि त्यामुळे तिला चालणे मुश्कील होऊन बसले. बायकोला होत असलेला हा त्रास बघून स्वत: राघवने पोहे बनविण्याचा प्लानिंग केले. पहिल्यांदा पोहे बनवले तेंव्हा त्यामध्ये मीठ कमी पडले म्हणून त्याने पुन्हा थोडे मीठ टाकले पण ते जरा जास्तच पडले आता हे जास्त मीठ पडलेले पोहे सरस्वती खाणार का ? तिला हे पोहे आवडतील का हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे प्रेमाने आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी काहीतरी बनवले आहे हि भावनाच मनाला सुखवणारी आहे. हि सगळी गंमत बघण्यासाठी बघा सरस्वती कलर्स मराठीवर.