‘वलय’ - ‘VALAY’


वलय
आयुष्यात ध्येयप्राप्तीपर्यंतचा मार्ग कधीच सोपा नसतो. प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनुभवाची हीच शिदोरी यशाच्या मार्गाकडे जाण्याचा रस्ता दाखवत असते. कोणतंही क्षेत्र त्याला अपवाद नाही. खेळाडूलासुद्धा या संघर्षाचा सामना करावाच लागतो. अशाच एका गुणी खेळाडूच्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘वलय’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाखा मिडिया वर्क्स निर्मित व निकी बत्रा दिग्दर्शित या सिनेमाचे शुटिंग झाले असून त्यातील काही दृश्ये नुकतीच फिल्मसिटी मध्ये चित्रित झाली. नागपूरमध्ये चित्रपटाचा काही भाग चित्रीत केला जाणार आहे.
अशोक कुंदनानी निर्मित ‘वलय’ या चित्रपटात अनिकेत केळकर, रेशम टिपणीस, सुरेखा कुडची, अभिलाषा पाटील, अमिषा आंबेकर, प्रदीप पाटील, अनिकेत मोगरे, प्रतीक भोसले, वैभव आमटे, अमित लेखवानी, सायरा खान, पूजा बनसोडे, रुसान शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘वलय’ चित्रपटाचे गीतलेखन व संगीत प्रकाश प्रभाकर यांचे आहे.

‘VALAY’

In life the path towards goal realization is never too easy. At every turn we face different problems and a lot of hurdles. Only our collective experience, gathered over a period of time, leads us towards our goal. No sphere of activity is an exception to this. Even sportsman have to face this battle. The film ‘Valay’ brings us the story of the struggles of one such talented sportsman. Produced by ‘Vishaka Media Works’ and directed by Nikki Batra, the shooting of the film ‘Valay’was recently completed and some scenes were shot in Filmcity. Some part of the film will be picturized in Nagpur.
Ashok Kundnani produced ‘Valay’ has the following actors; Aniket Kelkar, Resham Tipnis, Surekha Kudchi, Abhilasha Patil, Amisha Ambekar, Pradeep Patil, Aniket Mogre, Prateek Bhosle, Vaibhav Amte, Amit Lekhwani, Saira Khan, Pooja Bansode and Rusan Sheikh. The lyrics and music of the movie ‘Valay’ are by Prakash Prabhakar.

Subscribe to receive free email updates: