सरस्वती वाड्यामध्ये परतणार !

IMG_4783
सरस्वती राघवच्या मनामधील गैरसमज दूर करू शकेल ?
मुंबई १० जुलै २०१७ : सरस्वती मालिकेमध्ये राघव परतल्यानंतर सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्याज्यामुळे सरस्वतीला राघवच्या रागाचे आणि त्याच्या विचित्र वागण्याचे कारण कळतं नव्हते. पण,सरस्वतीला राघव स्वत: ते कारण सांगतो जे ऐकून सरस्वतीला कळत नाही राघवच्या मनातला गैरसमज कसा दूर करावा. राघवच्या मनामध्ये सरस्वतीबद्दल जे काही विष भरवण्यात आले आहे ते सरस्वती दूर करण्याचा प्रयत्न करते आहे. सरस्वतीनेच राघवला मारण्याचा प्रयत्न केला आहे हे कळल्यावर राघव सरस्वतीशी खूप वाईट वागायला लागला आहेमग ती वटपौर्णिमाच्या वेळेसचे त्याचे वागणे असो वा तिला जबरदस्तीने हात दिव्यावर ठेवायला सांगणे असो. सरस्वतीला राघवने वाड्याच्या बाहेर काढले आहे. तिच्याशी असलेले नाते तोडले आहेपण या कठीण काळामध्ये सरस्वतीचा मित्र हनी मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरस्वतीने हनीच्या सांगण्यावरून पुन्हा वाड्यामध्ये येण्याचा निर्धार केला आहे. पण,सरस्वती आता तिच्या ठमी बरोबर जुन्या लुक मध्ये मालिकेमध्ये परतणार आहेया बदलामुळे मालिकेमध्ये रंजक वळण येणार आहे हे नक्की. आता पुढे काय होणार सरस्वती वाड्यामध्ये जाऊन कसा राघवचा गैरसमज दूर करणार कसे विद्युलचे सत्य समोर आणणार या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लवकरच सरस्वती मालिकेमध्ये मिळणार आहेत.
सरस्वतीला राघवने वाड्याबाहेर काढले आहेत्यात मामा देखील वाड्याबाहेर आहेयासगळ्यात घराचा नोकरसुध्दा आता काम सोडून गेला आहे त्यामुळे सगळ्या कामाची जबाबदारी विद्युलवर आली आहे. त्यामुळे तिने घरासाठी नोकर शोधण्याची जबाबदारी हनीवर सोपवली आहे. हनी आणि सरस्वतीच्या प्लानिंगप्रमाणे हनी वाड्यामध्ये २-३ नोकर आणतो आणि त्यांना १-२ दिवसात पळवून लावतो. हनी विद्युलला मानवतो किसरस्वतीला कामाची गरज आहे तर आपण तिलाच वाड्यामध्ये नोकर म्हणून परत आणू. सरस्वती वाड्यामध्ये परतण्यास तयार होतेपणसरस्वती विश्राम मोरे म्हणून. हनीच्या समजण्यावरून तिने मनाशी हा निर्धार केला आहे किमी आता खचणार नाहीमोठ्या मालकांचा विश्वास मी परत मिळवणार आणि सत्य काय आहे ते मोठ्या मालकांच्या समोर आणणार.
सरस्वती वाड्यावर परतल्यानंतर कशी ती राघवच्या रागाला आणि तिरस्काराला सामोरी जाणार कशी ती विद्युलच्या कारस्थानांना उत्तर देणार हे बघन रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती सोम. ते शनि. संध्या ७.००० वा कलर्स मराठीवर.  

Subscribe to receive free email updates: