चाहूल मालिकेमध्ये नवे वळण निर्मला भोसले वाड्यामध्ये होणार बंदिस्त ! कोणामध्ये होणार दुरावा निर्माण ? कोण होणार सर्जापासून दूर ?

मुंबई ६ जुलै २०१७ : चाहूल मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच काही घटना घडत आहेत ज्यामुळे भोसले वाड्यामधील सदस्यांबरोबरच शांभवीदेखील चिंतीत आहे. सर्जाला वाड्यामधील भुताने झपाटनेसर्जाच्या वडीलांचा म्हणजेच यशवंतचा मृत्यू होणेया सगळ्याने वाड्यामध्ये एकप्रकारची शांतता पसरली होती. याच दरम्यान शांभवीने या वाड्यामधील भुताला मात देण्यासाठी एक सापळा रचला आहे. आता या सापळ्यामध्ये ती वाड्यातील भुताला कशी मात देणार भूत भोसल्यांचा पिच्छा सोडणार का शांभवीला अखेर तिच्या ध्येया मध्ये विजयी होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका चाहूल ८ जुलै ते १५ जुलै रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
शांभवीने स्वत:च्या मनाशी ठरवल्याप्रमाणे वाड्यातील सगळ्याची माफी मागतेहे सगळे होत असताना निर्मलाला असे वाटते किआता ती जिंकली आणि शांभवी भोसले वाडा सोडून जाणार. पणअस काहीच होत नाही. उलट शांभवी माफी मागून भोसले कुटुंबाला भोसले वाडा सोडून जाण्यास मनवते. निर्मला हे सगळ बघून खूप अस्वस्थ होते कारण अस जर झालं तर सर्जा तिच्यापासून दूर होणार हे तिला कळून चुकते. शांभवी निर्मलाला जाळ्यात अडकवून वाड्यामध्ये बंदिस्त करण्यात सफल होते. पणनिर्मलाची आता कोंडी झाली आहे कारणतिला कुठूनही मदत मिळत नाही आहे. त्यामुळे आता शांभवी खुश आहे. भोसले कुटुंब वाडा सोडून जायची तयारी करतात. दुसऱ्या वाड्यामध्ये ते राहण्यास सुरुवात करतात. आता सगळे निश्चिंत आहेत किआपण या वाड्यामध्ये सुरक्षित राहू शकतो, कारण शांभवीने भुताला वाड्यामध्ये बंदिस्त केले आहे. पणसर्जाला हे काही पटलेले नाहीत्याला वाडा सोडून जायची इच्छा नाही आहे. 
भोसले वाडा सोडून जाण्यास मान्यता दिल्यामुळे आता शांभवी निश्चिंत झालेली आहे. शांभवी भोसलेंना सांगते किआता वाड्यातील भूत तुम्हाला त्रास देणार नाही त्यामुळे मी आता जाऊ शकते. पणसर्जा नवीन वाड्यामध्ये रहायला जाणार किसर्जा त्यांच्या जुन्या वाड्यामध्ये एकटा रहणार यामध्ये निर्मला वाड्यामधून निघण्यासाठी कोणती धडपड करणार ती कुणाची मदत घेणार सर्जाच निर्मलाची नकळत मदत करणार शांभवी सर्जापासून दूर जाणार हे सगळ बघणे रंजक असणार आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका चाहूल ८ जुलै ते १५ जुलै रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: