शिरडी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक 08 जुलै 2017 ते सोमवार दिनांक 10 जुलै 2017 या काळात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, गुरु-शिष्य परंपरा फार प्राचीन आहे. आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्री साईबाबांच्या ह्यातीतही गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे. त्यामुळे या दिवसाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. श्री साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येवून समाधीचे दर्शन घेतात व या उत्सवास हजेरी लावतात. याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शनिवार दिनांक 08 जुलै रोजी पहाटे 4.30 वाजता श्रींची काकड आरती, 5.00 वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 5.15 वाजता व्दारकामाई श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, 5.20 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 6.00 वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायं. 7.00 वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ 9.15 वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार असून पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडी राहील.
रविवार दिनांक 09 जुलै रोजी सकाळी 4.30 वाजता श्रींची काकड आरती, 5.00 वाजता अखंड पारायणसमाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 5.20 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 6.00 वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी 7.00 वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ 9.15 वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दिनांक 10 जुलै रोजीची श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ 11.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.
उत्सवाच्या सांगता दिनी सोमवार दिनांक 10 जुलै सकाळी 5.05 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 6.00 वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी 6.15 वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी 10.30 वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.10 वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी 7.00 वाजता श्रींची धुपारती होईल तसेच रात्रौ 10.30 वाजता शेजारती होईल.
उत्सवाच्या निमित्ताने व्दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणाऱ्या श्री साईसच्चरिताच्या अखंड पारायणासाठी जे साई भक्त इच्छुक आहेत त्यांनी आपली नावे दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 1.00 ते सायंकाळी 5.30 यावेळेत समाधी मंदिरासमोरील व्यासपीठावर नोंदवावीत. सोडत पध्दतीने पारायणासाठी भक्तांची नावे सायंकाळी 6.00 वाजता निश्चित करण्यात येतील. उत्सव काळात तीन दिवस श्री साई सत्यव्रत (सत्यनारायण), अभिषेक पूजा व वाहनांची पूजा गर्दीचा अंदाज घेवून चालू किंवा बंद ठेवण्यात येणार असून श्रींना अर्पण केलेली वस्त्रे, वस्तु वगैरेंची जाहीर लिलावाने प्रसाद रुपाने विक्री करण्यात येणार आहे. याबरोबरच उत्सवाचे तीनही दिवस रात्रौ 8.00 ते 10.30 यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम होतील, असे ही श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.
यावर्षाचा हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सर्व विश्वस्त, कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
SHIRDI
Following the traditions of earlier years GURU POURNIMA FESTIVAL on behalf of the Shri Saibaba Sansthan Trust (Shirdi) will be celebrated between Saturday the 08th JULY 2017 and Monday the 10th JULY 2017. Smt. Rubal Agrawal, Executive Officer of the Sansthan has appealed to all devotees to participate in these celebrations in large numbers.
Smt. Agrawal said that Guru-Shishya is an ancient tradition. Ashadhi Pournima is celebrated to express profound gratitude to the teacher and hence is Guru Pournima. During the period of Shri Saibaba too, the Guru Pournima festival used to be celebrated with a huge fervor and has the same unique importance even today. Innumerable devotees with impeccable faith on Shri Saibaba arrive at Shirdi each year and paying obeisance to Him they attend the celebrations. Various programs have been arranged this year as well on the occasion of Guru Pournima. On Saturday the 08th JULY at 04.30 a.m. Kakad Aarti of Shri Sai will be performed and at 05.00 a.m. there will be a procession of Shri Sai photograph and Pothi. At 5.15 a.m. there will be a continuous reading of Sai Sacchirta. At 5.20 a.m. Holy bath of Shri Saibaba and Darshan will take place. At 6.00 a.m. Shri Sai Padya Pooja will be carried out. At 12.30 noon, there will be Noon aarti. There will be a keertan between 4.00 p.m. and 6.00 p.m. followed by Dhuparti at 7.00 p.m. At 9.15 The palanquin of Shri Sai will be taken by a procession through the city and after the procession returns by 10.30 p.m. Shejarti will be offered. On this day Dwarakamai will be open for entire night for reading of Sai Saccharit.
On the 9th JULY at 4.30 a.m., Kakad Aarti of Shri Sai will be performed, at 5.00 a.m. there will be ending of Akhand Parayan and a procession will be taken out of Shri Sai photo and Pothi. At 5.20 a.m. Holy bath of Shri Saibaba and Darshan will take place. At 6.00 a.m. Shri Sai Padya Pooja will be carried out. At 12.30 noon, there will be Noon aarti. There will be a keertan between 4.00 p.m. and 6.00 p.m. followed by Dhuparti at 7.00 p.m. There will be a procession of the Shri Sai Chariot through the city at 9.15 p.m. Being the main occasion of the Festival the Temple will be kept open for Darshan throughout the night. Hence the Shejarti for this day and Kakad Aarti for 10th JULY will not be held. On the platform next to Shri Sai Temple interested artists will be given an opportunity to perform Sai Bhajan (Hajeri) between 11.00 p.m. and 05.00 a.m.
On 10th JULY, the concluding day of the Celebrations, Holy bath for Shri Sai will be at 05.05 a.m. followed by Darshan , Padya Pooja for Shri Sai at 06.00 a.m. and Rudrabhishek at 06.15 a.m. at Gurusthan Temple. There will be a Gopalkala keertan and DahiHandi program at 10.30 a.m. There will be Noon aarti at 12.10 Noon, Dhuparti at 7.00 p.m. in the evening and Shejarti at 10.30 p.m. at night.
Those devotees who are interested for the Akhand Parayan of Sai Sachharit to be held on the first day of the festival at Dwarkamai Temple, should register their names at the platform in front of Samadhi Temple between 1.00 p.m. to 5.30 p.m. on the 7th JULY. The names of the devotees will be finalized by a DRAW at 6.00 p.m. During THREE days of the Festival, various regular activities such as Shri Sai Satyavrta (Satyanarayan), Abhishek Pooja will be suspended or continued based on the conditions of vehicular and other crowds. However on these days an open auction for various items such as clothes and others dedicated to Shri Saibaba will be held on these three days. Smt. Rubal Agrawal further said that programs by invited artists will be held at the stage near Samadhi Temple on all these three days between 8 p.m. and 10.30 p.m.
Under the guidance of Sansthan Chairman Dr.Suresh Haware, Vice-Chairman Chandrashekhar Kadam, all the Trustees and Executive Officer Smt.Rubal Agrawal, everyone including Dy Executive Officer Dr. Sandeep Aher, all Administrative Officers, Head of the Departments and entire staff are taking efforts to bring a grand success to the Celebrations.