‘जग्गू दादा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे बी टाऊनमध्ये एक खास स्थान आहे. ‘जग्गू दादा’ ते ‘बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफ’ हा प्रवास सोपा नव्हता. मात्र आपल्या अभिनयाच्या आणि हिमतीच्या बळावर अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी चित्रपटसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. असंख्य सिनेमांतील आपल्या बहारदार अदाकारीने त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. रविवारी ३ डिसेंबरला सकाळी ११.३० वा. झी मराठी वाहिनीवरील ‘द रिअल हिरो कथा समृद्धीच्या’ या कार्यक्रमात जॅकी श्रॉफ यांचा हा प्रवास उलगडला जाणार आहे.
जॅकी श्रॉफ यांचा रील व रिअल लाईफ प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणं हा प्रेक्षकांसाठी समृद्ध करणारा अनुभव असणार आहे. कार्यक्रमातील वेगळे जॅकी दादा आणि त्यांचे सामाजिक काम नक्की अनुभवा आर ए फाउंडेशन प्रस्तुत ‘द रिअल हिरो कथा समृद्धीच्या’ या कार्यक्रमात.
प्रसारण - रविवार ३ डिसेंबर सकाळी ११.३० वा. झी मराठी वाहिनीवर