लव्ह लग्न लोचा या मालिकेत सर्व कलाकार नागपूर ला आले आहेत. विषय आहे विनयची एंगेजमेण्ट. या कारणासाठी सगळेच सध्या विनयच्या गावी नागपूरला दोन कार घेऊन, लॉन्ग ड्राईव्हची मजा घेत आले आहेत. आता नागपूरला " लव्ह लग्न लोचा" मधील कलाकार किती रमतात, तिथे काय काय मजा होते आणि मुख्य म्हणजे विनयची एंगेजमेंट होते का? हि सर्व धमाल अनुभवायची असेल तर पाहात राहा झी युवावर लव्ह लग्न लोचा, सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ८:३० वाजता!
फ्रेशर्स मालिकेत सुद्धा नाशिक ला जाण्याचा प्लॅन सुरु आहे. पुढील ट्रॅक मध्ये अशी एक गोस्ट होते कि पहिला सायलीला आणि तिच्या पाठोपाठ आपल्या अख्ख्या फ्रेशर्स ची टीमला नाशिक ला जावे लागते. फ्रेशर्स ची टीम सुद्धा बरयाच काळानंतर त्यांच्या कॉलेजच्या सेटवरून बाहेर पडून निसर्गाचा आणि नाशिककरांचा अनुभव घेणार आहेत. आता नाशिक मध्ये जाऊन फ्रेशर्स ची नक्की काय मजा येणार आहेत. हे पुढच्या काही भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळेलच. झी युवावर फ्रेशर्स सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ७:०० वाजता पाहायला मिळेल.