झी टॉकीज आणि झी टॉकीज एचडीवर ‘कॅरी ऑन देशपांडे’

फेब्रुवारी म्हणजे प्रेमवीरांचा महिना. एव्हाना व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनचे सगळ्यांनाच वेध लागलेत. या सेलिब्रेशनची लज्जत आणखी वाढवली आहे ‘झी टॉकीज’वरील ‘एक सो एक’ धमाल चित्रपटांनी. येत्या रविवारी ५ फेब्रुवारीला, तीन मुलींना एकाच वेळी पटवू पाहणाऱ्या मि. देशपांडेंची धमाल कॉमेडी असणारा ‘कॅरी ऑन देशपांडे’ हा चित्रपट प्रेक्षकांना ‘झी टॉकीज’ आणि ‘झी टॉकीज एचडी’ वर दु. १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. पाहता येईल. 
तीन बायकांच्या तावडीत सापडलेला एकुलता-एक बिचारा नवरा... म्हणजेच मि. देशपांडे. एक बायको सांभाळताना नाकी नऊ येत असताना मि. देशपांडेंनी तीन लग्नं कशी काय केली असतील? नेमकी काय फसगत झाली असेल मि. देशपांडेंची ? तीन बायकांच्या गोंधळात मि. देशपांडेंची ही धमाल प्रेक्षकांना हमखास पोट धरून हसवेल. विजय पाटकर दिग्दर्शित 'कॅरी ऑन देशपांडे' या चित्रपटातील पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, विजय पाटकर, मानसी नाईक, हेमलता बाणेसागर कारंडेजयवंत वाडकरविजय कदमसविता मालपेकर यांसारख्या कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदी ‘झी टॉकीज’ आणि ‘झी टॉकीज एचडी’वर रविवारी ५ फेब्रुवारीला दु. १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. पहायला विसरू नका. 

Subscribe to receive free email updates: