सौंदर्य... स्त्री असो वा पुरुष अगदी साऱ्यांनाच आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. सध्याचा जमाना हा ग्लॅमरचा आहे. नवनवीन फॅशन्स रुजवणाऱ्या ग्लॅमर क्षेत्राचा प्रभाव हा सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ट्रेंडी फॅशन्स लगेच तरुणांमध्ये फेमस होतात. एखाद्या फॅशनची क्रेझ निर्माण झाली की सगळेजण तो ट्रेंड आत्मसात करतात. अशावेळी आपल्याला ते चांगले दिसतील का..? किंवा ती फॅशन आपल्या शरीरयष्टीला कशी शोभून दिसेल... याची अचूक काळजी घेण्यात ब्युटी पार्लर्स सक्षम असतात. असंच एक अद्ययावत ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ माहीममध्ये लवकरच आपल्या साऱ्यांच्या सेवेस तत्पर असणार आहे. केतकी मालपेकर आणि अमृता राव या दोघींनी मिळून उभारलेले ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’चे उद्घाटन येत्या रविवारी २९ जानेवारीला होणार आहे.
अमृता राव आणि केतकी मालपेकर यांच्या ब्युटी बार मध्ये तुम्हाला सगळ्या ट्रिटमेंट्सचा एकाचवेळी उपभोग घेता येईल. हेअर ड्रेसिंग, हेअर कलरिंग याचबरोबर अलीकडे तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ असणारी नेल्स आर्ट, नेल्स एक्स्टेंशन यांसारख्या ट्रिटमेंट्सचा ही फायदा तुम्हाला ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ मध्ये घेता येईल. या येथील नवनवीन टेक्निक्स आणि उत्तम टेक्निशियन्सच्या साथीने तुम्ही अधिकाधिक सुंदर दिसू शकता पण त्यासाठी तुम्हाला एकदा तरी ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ला भेट द्यावी लागेल.
संपर्कासाठी : केतकी मालपेकर – ९९३०१९१०७२ अमृता राव – ९८२१०१२६९२
सिल्वूएट हेअर अँड ब्युटी बार :
१४-प्लॉट नो. ३३३, कार्ड मेन्शन, शीतलादेवी रोड, युनियन बँक जवळ, माहीम, मुंबई-१६