सख्या रे, अस्स सासर सुरेख बाई, 2 MAD आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील कलाकारांनी जिंकली विद्यार्थ्यांची मने !
मुंबई, २० फेब्रुवारी २०१७ : सध्या कॉलेजसमध्ये annual days आणि फेस्टची धूम सुरु आहे. सगळ्याच कॉलेजेसमध्ये उत्साहाचे आणि जोशपूर्ण वातावरण आहे. अश्या माहोलमध्ये मध्ये जर तुमचे लाडके कलाकार तुम्हाला भेटायला थेट तुमच्या कॉलेजमध्ये आले तर ? कलर्स मराठीवरील सख्या रे, अस्स सासर सुरेख बाई,कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि 2 MAD या कार्यक्रमातील कलाकार नुकतेच विद्यालंकार कॉलेजमध्ये विद्यार्थांची भेट घेण्यासाठी गेले होते. आपल्या लाडक्या कलाकारांना कॉलेजमध्ये बघून विद्यार्थ्यांना आनंद झाला. जवळजवळ ८००-१००० विद्यार्थी या annual day च्या निमित्ताने आपल्या आवडत्या कलाकारांना बघयाला आले. कॉलेजमध्ये बऱ्याच प्रकारच्या ऍक्टिव्हीटी राबाविण्यात आल्या होत्या ज्याच्यासाठी सख्या रे मधील सुयश टिळक आणि रुची सवर्ण, अस्स सासर सुरेख बाई मधील महाराष्ट्राची लाडकी मृणाल दुसानीस आणि श्वेता पेंडसे, कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील विनोदवीर योगेश शिरसाट आणि नम्रता आवटे आणि 2 MAD –महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या सध्या गाजत असलेल्या कार्यक्रमातील स्पर्धकांनी म्हणजेच निखील, आर्या डोंगरे, सोनल विचारे आणि मंगेश यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला.