‘झी टॅाकीज’वर होळीचे रंग

गेल्या काही वर्षापासून होळी सणाच्या आनंदात छोटा पडदाही सामील झाला आहे. अनेक वाहिन्या केवळ होळीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करताना पाहायला मिळतात. होळीनिमित्त झी टॅाकीज’ वर चित्रपटांचे विविध रंग पाहायला मिळणार आहेत. होळी विशेष भागांअतर्गत झी टॅाकीज’ वर १२ मार्च ते १४ मार्च दरम्यान सैराट, लालबागची राणी तसेच दादा कोंडकेच्या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे.
रविवार १२ मार्चला दुपारी १२.०० व सायंकाळी ७.०० वाजता सैराटचा आस्वाद घेता येणार आहे तर १३ मार्चला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. लालबागच्या राणीचा वर्ल्ड टेलीव्हिजन प्रिमीयर प्रेक्षकांना पाहता येईल. १४ मार्चला संपूर्ण दिवस दादा कोंडकेच्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे
मनोरंजनाच्या एका नव्या रंगाची अनुभूती प्रेक्षकांना देत यंदाची होळी प्रेक्षकांसाठी खास करण्याचा झी टॅाकीज’चा प्रयत्न आहे. होळीच सेलिब्रेशन व सिनेमांची मेजवानी हे झी टॅाकीज’च्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खास धमाका ठरेल.

Subscribe to receive free email updates: