मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा ट्रेंड पहायला मिळतोय तो म्हणजे नव्या चेह्ऱ्यांचा. हे नवे चेहरे चित्रनगरीत आपली ओळख निर्माण करू पाहतायेत.नाटक, टीव्ही मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या या चेहऱ्यांना आता मोठ्या पडद्याचे वेध लागलेले दिसताहेत. अक्षया हिंदळकर हे त्यातलंच एक नाव. छोट्या पडद्यावरील ‘सरस्वती’ या मालिकेत झळकलेली अक्षया आता मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. रॉकी या आगामी अॅक्शनपॅक्डमराठी सिनेमात अक्षया आपल्याला नायिकेच्या रूपात दिसणार आहे. संजना असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून शांत, सोज्वळ संजनाच्या आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटना नेमकं काय वळण घेणार याची रोमांचकारी कथा म्हणजे रॉकी सिनेमा.
‘सेवेन सीज्’ व ‘ड्रीम विव्हर’ प्रोडक्शन्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अदनान शेख करीत आहेत. आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल बोलताना अक्षया सांगते की, दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. प्रत्येकाकडून बरंच काही शिकायला मिळतंय. रोमान्स, फॅमिली ड्रामा व अॅक्शन याचे कॉम्बिनेशन असलेल्या या सिनेमात प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, गणेश यादव, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत, अक्षया हिंदळकर संदीप साळवे, हिंदीतील अभिनेते राहुल देव हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे निर्माते मनेश देसाई, नितीन शिलकर, प्रशांत त्रिपाठी, हिमांशू अशर आहेत. चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख यांचे तर संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान शेख यांची आहे. छायांकन फारुख खान तर संगीत समीर साप्तीस्कर, वसीम सदानी वइम्रान सदानी यांचे आहे.
Related Posts :
'How I Met Your Mother' was inspired by 9/11 attacks - Times of India - India Entertainment News Today - October 26, 2016 at 08:41AM'How I Met Your Mother' was inspired by 9/11 attacks - Times of India - October 26, 2016 at 08:41AM - [Latest Indian Entertainment News Toda… Read More...
Dhanush and Trisha or Karthi and Nayanthara: Whose debut pairing has excited you more? - Bollywood Life - India Entertainment News Today - October 26, 2016 at 10:05AMDhanush and Trisha or Karthi and Nayanthara: Whose debut pairing has excited you more? - Bollywood Life - October 26, 2016 at 10:05AM - [Lat… Read More...
Team of 'The Kapil Sharma Show' celebrates 6 months of successful run - Times of India - India Entertainment News Today - October 26, 2016 at 07:58AMTeam of 'The Kapil Sharma Show' celebrates 6 months of successful run - Times of India - October 26, 2016 at 07:58AM - [Latest Indian Entert… Read More...
Deepika to present MTV Europe award - The Hindu - India Entertainment News Today - October 26, 2016 at 06:03AMDeepika to present MTV Europe award - The Hindu - October 26, 2016 at 06:03AM - [Latest Indian Entertainment News Today]
News18
Deepika… Read More...
Ranveer Singh taking inspiration from Hitler and Aamir Khan for Padmavati - Bollywood Life - India Entertainment News Today - October 26, 2016 at 09:45AMRanveer Singh taking inspiration from Hitler and Aamir Khan for Padmavati - Bollywood Life - October 26, 2016 at 09:45AM - [Latest Indian En… Read More...