भारताच्या ७१ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 'अत्त दिप भव शिक्षण संस्था, तुळजापूर' आणि किरण परमार यांच्या 'तुळसी आर्ट, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने "सलाम तिरंगी लहरों को" या शीर्षकाखाली जहांगीर आर्ट गॅलरीत एका हे प्रदर्शन २१ ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे. प्रख्यात हिंदुस्थानी अनोख्या चित्र आणि शिल्पकलेचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शास्त्रीय गायक स्वराधिश डाॅ. भरत बलवल्ली यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
भारताच्या ७१ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून "सलाम तिरंगी लहरों को' या शीर्षकाखाली जहांगीर आर्ट गॅलरीत हे चित्र आणि शिल्पांचे प्रदर्शन सुरु असून येत्या २१ तारखेपर्यंत ते रसिकांसाठी खुले राहणार आहे. ह्या प्रदर्शनात प्रख्यात कलाकार दिनकर जाधव, प्रमोदबाबू रामटेक, अभंग बाळासाहेब, शोभा घारे, रतन शाह बापूसाहेब झांजे, पी. डब्लू. दीपक, तुका जाधव यांच्यासह एकूण ३५ मान्यवर कलावंतांच्या कलाकृती असून भारतभरातील तरुण कलावंतांसोबतच बुजुर्ग कलावंताच्या चित्रकलाकृती व शिल्पांचा समावेश आहे. ह्या सर्व कलाकृती शांतीचा संदेश देणाऱ्या असल्याचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक स्वराधिश डाॅ. भरत बलवल्ली यांनी सांगितले. त्यांनी सर्व ३५ मान्यवर कलावंतांच्या कलाकृतींचे बारकाईने निरीक्षण करून कलावंतांचे कौतुक करीत भारतीय कला जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हणाले. आपल्या देशात असलेली विविधता प्रेत्यक क्षेत्रात दिसून येते, या प्रदर्शनातून ती अधिक खुलून आली आहे. जगाने दोन महायुद्ध पहिली असून आता पुन्हा युद्ध नको. जगाला शांतता हवी आहे. आणि हेच या प्रदर्शनातील कलाकृतींद्वारे चित्रित केले आहे. यातील कोणतेही पेंटिंग घ्या किंवा शिल्प घ्या त्यातून तुम्हाला 'पिस' अनुभवता येईल असेही बलवल्ली यांनी सांगितले.
आज जगाला शांतता हवी असून ह्या प्रदर्शनातील ३५ कलावंतांच्या प्रत्येक कलाकृतीतून तो संदेश पाहायला मिळत आहे असे ते म्हणाले.
या प्रसंगी विशेष स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली. देशभक्ती आणि विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी.