कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील कल्लाकारांचा प्रख्यात विनोदीनटांना मानवंदना ! कॉमेडीची बुलेट ट्रेनने गाठला ३२५ एपिसोडचा पल्ला

मुंबई१३ जानेवारी२०१७ : कलर्स मराठीवरील महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो ज्या कार्यक्रमाने महराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर बरीच वर्षे राज्य केले आणि प्रेक्षकांना हसवले ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाचे ३२५ एपिसोड येत्या १९ जानेवारीला पूर्ण होणार आहेत. या कार्यक्रमातील लोकप्रिय विनोदवीरांची खुशखुशीत विनोदशैलीत्यांनी साकार केलेली अतरंगी पात्रत्यांच्या खुमासदार विनोदांच्या मेजवानीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आणि प्रेक्षकांचे अपार प्रेम त्यांना लाभले.  या कार्यक्रमाच्या ३२५ एपिसोडनिमित्त या कल्लाकारांनी प्रख्यात विनोदीनटांना मानवंदना दिली आहे.भारतामधील आणि भारताबाहेरील प्रख्यात विनोदवीर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांच्या विनोदशैलीचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत असे चार्ली चाप्लीनतसेच संपूर्ण भारताला आपल्या विनोदाने वेड लावले असे दादा कोंडकेमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडेआपल्या अनोख्या विनोदशैलीसाठी आणि आपल्या मालवणी बोलीसाठी सुप्रसिध्द असलेले मच्छीद्र कांबळी तसेच वगनाट्यासाठी प्रसिद्ध असलेले काळू बाळू या भावांची जोडी यांना ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मधील कल्लाकार मानवंदना देणार आहेत. हा विशेष भाग तुम्हाला कलर्स मराठीवर १९ आणि २० जानेवारीला रात्री ९.३० वाजता बघायला मिळणार आहे. या विशेष भागामध्ये कलर्स मराठीवरील प्रेक्षकांचे लाडक्या कलाकारांनी देखील या कल्लाकारांचा कल्ला आणि धमाकेदार स्कीट बघण्यासाठी हजेरी लावली. यामध्ये तू माझा सांगाती या मालिकेतील चिन्मय मांडलेकर (तुकाराम) आणि प्रमिती नरके (आवली) गणपती बाप्पा मोरया मधील सायली पाटील (पार्वती) अन्लेश देसाई (शंकर)अस्स सासर सुरेख बाई मालिकेतील संतोष जुयेकर (यश) आणि श्वेता पेंडसे (विभावरी)सरस्वती मालिकेमधील तितिक्षा तावडे (सरस्वती) आणि माधव देवचक्के (कान्हा) हे  उपस्थित होते.
DSC_7748या विशेष भागामध्ये ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मधील कल्लाकार जोड्यांमध्ये प्रख्यात विनोदीनटांना आपल्या विनोदकौशल्याने स्कीटद्वारे मानवंदना देणार आहेत. ज्यामध्ये एपिसोडची सुरुवात चार्ली चाप्लीन यांच्या धम्माल स्कीटने झालीहे स्कीट समीर चौगुले आणि भक्ती रत्नपारखी यांनी प्रस्तुत केले. तसेच सुहास परांजपे, श्याम राजपूत आणि प्रभाकर मोरे यांनी मच्छीद्र कांबळी तर अरुण कदमपंढरीनाथ कांबळे आणि अनुपमा ताकमोघे यांनी महाराष्ट्राची लोकधारा ज्यांनी सुरु केले असे शाहीर साबळे यांच्या आठवणीत एक स्कीट सादर केले जे जमलेल्या प्रेक्षकांना विशेष आवडले. अंशुमन विचारे आणि विशाखा सुभेदार यांनी पु.ल.देशपांडे यांच्या प्रसिध्द व्यक्ती आणि वल्ली मधील अंतू बर्वा आणि त्यांना भेटायला आलेली एक महिला यावर स्कीट सादर केले. तसेच प्रसाद आणि संदीप गायकवाड यांनी दादा कोंडके आणि योगेश शिरसाट,नम्रता आवटेरोहित यांनी काळू बाळू यांवर स्कीट सादर केले. हि सगळी स्कीट बघत असताना नक्कीच या सगळ्यांच्याच आठवणींचे स्मरण झाले यात वाद नाही. प्रेक्षकांना देखील हे स्कीट नक्कीच या सगळ्या विनोद वीरांची आठवण देऊन जातील.   
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ गेल्या वर्षी एका नव्या ढंगातस्वरूपात आणि नवीन परीक्षकांना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्या बदलालाही प्रेक्षकांनी अगदी मोकळ्या मनाने स्वीकारले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करत आहे तसेच सोनाली कुलकर्णी आणि महेश कोठारे तुम्हाला परीक्षण करतात. अरुण कदमसमीर चौगुले,पंढरीनाथ कांबळेअंशुमन विचारेविशाखा सुभेदारयोगेश शिरसाटनम्रता आवटेश्याम राजपूत, पूजा नायकप्रभाकर मोरेभक्ती रत्नपारखीसंदीप गायकवाडप्रसादअनुपमा ताकमोघे या कल्लाकारांच्या विनोदांनी महाराष्ट्राला हसण्याचे आरक्षण दिले आणि आता याच कार्यक्रमाचा ३२५ विशेष भाग बघायला विसरू नका कलर्स मराठीवर १९ आणि २० जानेवारीला रात्री ९.३० वाजता.

Subscribe to receive free email updates: