"छंद प्रितीचा" च्या बोर्डावर हाऊसफुल्ल ची पाटी

 कोणताही सिनेमा एखाद्या श्रेणीसाठी बनतो... एका वयोगटासाठी बनलेला सिनेमा दुसऱ्या वयोगटातीलव्यक्तींना तितकासा रूचत नाहीमात्र चांगल्या कलाकृती याला नेहमीच अपवाद ठरतातप्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंदप्रितीचा’ हा सिनेमा त्यापैकीच एक... ज्याला वयाचं बंधन नाहीउत्तम कथानकउत्कृष्ट अभिनयसुमधूर संगीतआणि कलात्मक नृत्याच्या जोरावर या चित्रपटाने बाजी मारली आहे.  सिनेसृष्टीतील मान्यवरकलाकारयांच्याबरोबरच प्रेक्षकांनी सलग तिस-या आठवड्यात चित्रपटाला विशेष पसंती दिली आहे    शाहीर सत्यवानाच्या लेखणीतून अवतरलेली श्रृंगारिक लावणीशाहीरी लावणीसवाल - जवाब यासारख्यागीतांवर नृत्यांगना चंद्राच्या लावणीचं दिलखेचक सादरीकरण प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवण्यात यशस्वी झालाआहेत्यामुळे प्रेक्षकांनी त्याला विशेष दाद दिली आहेमहाराष्ट्रातील कोल्हापूरसांगलीसातारा या भागात प्रेक्षकांनीलावण्यांचा आनंद घेतला आहे२५० हून अधिक चित्रपटागृहामध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला असून तो हाऊसफुलचालला आहे.  गावापासून शहरापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं मनोरंजन करणा-या तमाशाचा आनंद रसिकांनी याचित्रपटाच्या माध्यमातून घेतला आहे.
        रसिकमनांवर लावणीची जादू करणा-या चंद्रकांत जाधव निर्मितआणि एन रेळेकर दिग्दर्शित छंद प्रितीचा हासंगीतमय प्रवास तुम्ही अजून अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा.

Subscribe to receive free email updates: