चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत दशक्रियाचा ट्रेलर लाँच! राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'दशक्रिया' येत्या १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार!

विविध चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच ३ राष्ट्रीय व ११ महाराष्ट्र राज्य पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या  सौ. कल्पना विलास कोठारी यांच्या 'रंगनील क्रिएशन्स'निर्मित व संजय कृष्णाजी पाटील लिखित – प्रस्तुत आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रियाया बहुचर्चीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची विशेष उत्सुकता निर्माण झाली असून या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटातील सर्व प्रमुख कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत माहीमच्या सिटी लाईट चित्रपटगृहात नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील प्रमुख चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या दशक्रिया या चित्रपटाचा ट्रेलर जनसामान्य आणि दर्दी रसिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण करेल आणि चित्रपटगृहात त्यांना येण्यास प्रेरित करेल असे मत लोकप्रिय जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी याप्रसांनी व्यक्त केले. या ट्रेलर प्रदर्शनाच्या निमित्ताने या चित्रपटातील जवळपास सगळेच प्रमुख कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
प्रथम पदार्पणातच ३ राष्ट्रीय आणि ११ राज्य पुरस्कारांवर आपले नाव कोरून दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटील यांनी आपली दिग्दर्शनातील चुणूक दाखवीत विविध राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय सन्मान मिळून आपली वेगळी छाप सोडली आहे. दर्जेदार चित्रपट निर्मितीचं अवघड स्वप्न पाहत सौ. कल्पना विलास कोठारी यांनी मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. यापूर्वी त्यांनी अभिनय आणि निर्मिती करीत नाट्यसृष्टीत दर्जेदार बालनाट्यकृती आणि व्यावसायिक नाट्यनिर्मिती केली आहे. 'दशक्रियासारख्या एका अत्यंत वेगळ्या विषयावरील निर्मिती करून त्यांनी चित्रपट निर्मितीत आपले भक्कम पाय रोवले आहेत. 'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवाससारख्या दर्जेदार आणि रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांनी  'दशक्रिया'ची पटकथासंवादगीते लिहिली आहेत. दशक्रियाची कथा जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या बहुचर्चित'दशक्रियाया साहित्यकृतीवर आधारित आहे. 'दशक्रियाया चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचं वास्तव दाखवीत जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरमनोज जोशीअदिती देशपांडेमिलिंद शिंदेमिलिंद फाटकउमा सरदेशमुखअशा शेलारनंदकिशोर चौघुलेसंतोष मयेकर,उमेश मिटकरीतसेच प्रथम पदार्पण करणारे बालकलाकार आर्या आढावविनायक घाडीगावकर यांच्या सोबत पंकज चेंबूरकरअनुश्री फडणीसरसिका चव्हाणसंदीप जुवाटकरविद्यासागर अध्यापकप्रशांत तपस्वीअनिल राबाडेसंस्कृती रांगणेकरराहुल शिरसाटसोनाली मगरउमेश बोलकेधनंजय पाटीलअभिजित झुंझारराव,गणेश चंदनशिवेप्रफुल्ल घागमनोहर गोसावीतृप्ती अटकेकरविनोद दोंदे मनाली सागर रायसोनीरुचा मयुरेश शिवडेकैवल्य पिसेक्षितिजा पंडितश्रेया चौघुले,यांच्यासह जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून विनोदी अभिनेते आनंदा कारेकरजयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.
जेष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश आणे यांनी 'दशक्रिया'चा कॅनव्हास जिवंत केला आहे. सह निर्माते नील कोठारी असून लाईन प्रोड्युसर मनाली कोठारी रायसोनी आहेत. आघाडीचे संगीतकार अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढविण्यात यशस्वी झाले असून स्वप्नील बांदोडकरबालशाहिर पृथ्वीराज माळीकस्तुरी वावरेआरती केळकरआरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे. नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना सौ.स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडेयांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे. जनसंपर्कात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या राम कोंडीलकर यांनी दशक्रीयाची कार्यकारी निर्मितीप्रसिद्धी व मार्केटिंगची जबाबदारी पहिली आहे.

Subscribe to receive free email updates: