सई ताम्हणकर महाराष्ट्राची 'मोस्ट स्टायलिश दिवा'

मराठी फिल्म इंडस्ट्रीला ग्लॅमर आणणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच स्टाईल आयकॉन राहिली आहे. तरुणाईने तिचे अनेक ट्रेंड्स follow केलेत, आणि तिचे अनेक फॅशन स्टेटमेंट्स चर्चेचा विषय ठरलेत.  तिच्या ह्याच फॅशन सेन्सला गौरविण्यासाठी ह्या वर्षीचे  लोकमत अवॉर्ड्स एक खास निमित्त ठरलेत. मराठीतली  ' मोस्ट स्टायलिश दिवा' हा अवॉर्ड देऊन तिला गौरवण्यात आलं. हा अवॉर्ड स्वीकारताना देखील सई ताम्हणकर अवॉर्डला साजेसा असाच पेहराव करून आली होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे यांनी डिझाईन केलेला काळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे दागिने  न घालता, सई लोकमत अवॉर्डच्या च्या रंगमंचवार 'मोस्ट स्टायलिश दिवा' हा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी अवतरली. 
ह्या अवॉर्ड बाबत सई म्हणते, "" स्वतःचे पब्लिक अपिअरन्सेस स्टयलिश आणि फॅशनेबल  ठेवण्याचे जे प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्नांना सन्मानित करण्यासाठी कोणी तुम्हाला 'मोस्ट स्टायलीश दिवा' असा अवॉर्ड देतात तेव्हा खूप छान वाटत. लोकमत आणि दर्डा कुटुंबीयांची मी खूप आभारी आहे. आयुष्यात विविध वाटचाली करणाऱ्या लोकांना असं एकाच मंचावर भेटणं आणि त्यांच्यासोबत गौरविले जाणं फार छान वाटत. हा अवॉर्ड नक्कीच मला आणखी स्टयलिश आणि फॅशनेबल राहण्यास उद्युक्त करेल ह्यात शंका नाही."

Subscribe to receive free email updates:

Related Posts :