बॉक्स ऑफिसवर ‘दशक्रिया’सुपरहिट!

·       मराठी चित्रपटसृष्टीला संजीवनी!
·       पहिल्यांदा निर्मिती करणाऱ्यांसाठी नवी चेतना!
·       लवकरच जगभरातही प्रदर्शित होणार!
‘रंगनील क्रिएशन्स’ निर्मित ३ राष्ट्रीय व ११ राज्य पारितोषिक विजेत्या 'दशक्रिया' या बहुचर्चीत लोकप्रिय चित्रपटाने महाराष्ट्रातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये घसघशीत यश मिळवीत बॉक्स ऑफिसवर ‘हाउस फुल’ कलेक्शन करीत सुपरहिटचा मान पटकावला आहे. मराठी चित्रपट व्यवसायातील नवनिर्मितीला चालना देत बॉक्स ऑफिसवर कमाल केलेला हा चित्रपट या क्षेत्रात पहिल्यांदा निर्मिती करणाऱ्या निर्मीतीसंस्थांसाठी प्रेरणादायी ठरला असून, या वर्षअखेरीस तिकीट बारीवर आपली  कमाल दाखवीत मराठी चित्रपटसृष्टितील मरगळ झटकून काढली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटउद्योगविश्वाला नवी संजीवनी मिळाली असून दर्जेदार निर्मिती करणाऱ्या कलावंतांचे मनोबळ वाढले आहे. दुसऱ्या आठवड्यात 'दशक्रिया'चीयशस्वी घोडदौड दुप्पट वेगात सुरु आहे.
‘रंगनील क्रिएशन्स’ निर्मित 'दशक्रिया' १७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु वेगवेगळ्या वादविवादांमुळे निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीमुळे काही ठिकाणीचे खेळ पहिल्या दिवशी शुक्रवारी बंद ठेवण्यात आले होते. परंतु प्रेक्षकांनी त्याला जोरदार प्रतिकार केल्याने जळगाव वगळून शुक्रवारचे बहुतांश खेळ संपन्न झाले. शनिवारपासून सर्व ठिकाणीचे खेळ पूर्ववत करण्यात आले होते. या चित्रपटाला मायबाप रसिकांनी भरभरून प्रतिसाद देत शनिवार, रविवारचे जवळपास ३५० हून अधिक खेळ ९५ टक्के प्रतिसाद देऊन ‘हाउसफुल’ केले. प्रेक्षकांनी संपूर्ण आठवड्यात वाढता प्रतिसाद देत 'दशक्रिया' चित्रपट कर्त्यांच्याच्या गळ्यात ‘सुपरहिटची’ माळ घातली.
'दशक्रिया'चे दुसऱ्या आठवड्यात पदार्पण झाले असून संपर्ण महाराष्ट्रात दररोज २०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुरु आहे. सर्वत्र चित्रपटाचे उत्स्फूर्त स्वागत होत असून 'दशक्रिया'ला आता कुठेही विरोध होत नाही. दुसऱ्या आठवड्यात 'दशक्रिया'चे ७ दिवसांत एकूण जवळपास २५०० हून अधिक खेळ होणार आहेत. ह्या चित्रपटासाठी सर्व माध्यमांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असून काही वेगळ, प्रयोगशील आणि दर्जेदार देणाऱ्यांसाठी आशादायी असल्याचे या चित्रपटाचे पटकथा, संवाद, गीत, प्रस्तूतीकार प्रयोगशील साहित्यिक-कवी संजय कृष्णाजी पाटील, निर्मात्या सौ. कल्पना विलास कोठारी, कथाकार बाबा भांड, दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटील, कार्यकारी निर्माता, प्रसिद्धिकार राम कोंडू कोंडीलकर यांनी सांगत, सर्वांचे आभार मानले आहेत.
या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरमनोज जोशीअदिती देशपांडेमिलिंद शिंदेमिलिंद फाटकउमा सरदेशमुखअशा शेलारनंदकिशोर चौघुलेसंतोष मयेकरउमेश मिटकरीतसेच प्रथम पदार्पण करणारे बालकलाकार आर्या आढावविनायक घाडीगावकर यांच्यासह जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून विनोदी अभिनेते आनंदा कारेकरजयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.
'दशक्रिया' चित्रपटाचे पटकथा, संवाद, गीत, प्रस्तुती प्रयोगशील साहित्यिक आणि कवी संजय कृष्णाजी पाटील यांची असून पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीत ‘रंगनील क्रिएशन्स’द्वारे सौ. कल्पना विलास कोठारी यांनी पाउल टाकले आहे. जेष्ठ साहित्यक बाबा भांड यांच्या राज्य पुरस्कार विजेत्या दशक्रिया या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. नवी उमेद घेऊन पदार्पणात राष्ट्रीय पुरस्कारावर शिक्का मारणाऱ्या दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटील यांनी या चित्रपटाच दिग्दर्शन केल आहे. जनसंपर्कात विशेष कामगिरी करणाऱ्या राम कोंडू कोंडीलकर यांनी दशक्रियाची कार्यकारी निर्माती, प्रसिद्धी व विपणनचे काम पाहिले आहे. जेष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश आणे यांनी 'दशक्रिया'चा कॅनव्हास जिवंत केला आहे. सह निर्माते नील कोठारी असून लाईन प्रोड्युसर मनाली कोठारी रायसोनी आहेत. आघाडीचे संगीतकार अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढविण्यात यशस्वी झाले असून स्वप्नील बांदोडकरबालशाहिर पृथ्वीराज माळीकस्तुरी वावरेआरती केळकरआरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे. नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना सौ.स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडेयांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :