2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरच्या सेटवर अमृता खानविलकरला केले १२ वर्षाच्या मुलाने प्रोपोस श्री दळवी या चिमुकल्याने जिंकले अमृताचे मन...



 मुंबई८ जानेवारी२०१७ :कलर्स मराठी वर सुरु झालेल्या2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर  च्या सेटवर महाराष्ट्रात असलेले भन्नाटtalent प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्य पद्धती थक्क करणाऱ्या आहेत. इथे आलेल्या मुला – मुलींचा डांस बघून या कार्यक्रमाचे परीक्षक अमृता खानविलकरसंजय जाधव आणि उमेश जाधव देखील थक्क आहेत. एका पेक्षा एक अप्रतिम नृत्य सादर करून ते महाराष्ट्राला आपल्यातलाMADness दाखवून वेड लावायला सज्ज आहेत हे नक्की.   
vlcsnap-error228
या मंचावर अनेक चिमुकले मुल मुली आले ज्यांनी परीक्षकांची मने जिंकली आपल्या हटके डांस स्टाईल ने तर आपल्या दिलखेचक अदांनी आणि काहींनी तर चक्क आपल्या मनातील इच्छाच पूर्ण केल्या. परीक्षकांप्रमाणेच ते प्रेक्षकांची मने देखील नक्कीच जिंकतील यात शंका नाही. पुण्यातला श्री दळवी या फक्त १२ वर्षाच्या मुलाने अमृता हिला प्रोपोज केले. श्री दळवीतील निरागसता आणि नृत्य याच्या प्रेमात परीक्षक पडले. डांस ऑडीशन दरम्यान त्याने संपूर्ण डांस अमृताकडे बघून केला आणि जेंव्हा उमेश जाधव यांनी त्याला विचारले कितू अस का केले तेंव्हा त्याने अतिशय निरागस रीत्या अमृताला प्रोपोज केले तो म्हणाला “तू मला लय आवडते” आणि त्यावर अमृता देखीलI Love you too म्हणाली आणि त्याच्या बरोबर डांस देखील केला. उमेश जाधव यांनी त्याला आपल्या अंदाजात comments देखील दिल्या.
याच मंचावर मुंबईमधील तुषार खेराडे हा स्टेजवर येताच अमृताकडे बघून म्हणाला तुम्हाला बघायचं होत आणि इतकेच नव्हे तर तो अमृताला बघून खूप खुश झाला. आपण ज्या व्यक्तीला आपला idol मानतो तिला भेटल्यावर अथवा तिच्यासमोर डांस करण्याची संधी मिळाल्यावर भारावून जाणे हे सहाजिक आहेतसच काहीस तुषारच देखील झाल.

आम्हाला खात्री आहे श्री दळवीचा आणि तुषारचा भन्नाट डांस तुम्हाला देखील आवडेल. तेंव्हा महाराष्ट्रातील असे भन्नाट डांस आणि talent बघण्यासाठी बघा 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर फक्त कलर्स मराठीवर सोम आणि मंगळ रात्री ९.३० वाजता.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :