झी टॅाकीज व झी टॅाकीज एचडीवर सैराट

मराठी चित्रपटसृष्टीत सैराटने अनोखा इतिहास रचला. भाषेच्या सीमा ओलांडून तेलुगूतमिळमल्याळम कन्नड आणि पंजाबी या पाच भाषांमध्ये सैराटचा होणारा रिमेक ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी गौरवाची बाब आहे. इतर भाषांत मराठी चित्रपटाचा रिमेक होणे ही मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलीच वेळ आहे. अशा या यशस्वी चित्रपटाचे प्रक्षेपण झी टॅाकीज  झी टॅाकीज एचडी वर रविवार २२ जानेवारी दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ६.०० वा. प्रथमच केले जाणार आहे.
कलाकार निवडीपासून ते पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा सगळ्याच विभागांत ‘सैराट’ने आपलं वेगळेपण जपलं. आजच्या समाजातल्या अतिशय भीषण आणि व्यापक समस्येला समाजासमोर मांडण्यात आलं आहे. आर्ची आणि परश्याच्या प्रेमकथेसोबत मानवी समाजाच्या अनेक छटा ‘सैराट’ने अतिशय परिणामकारकरित्या पडद्यावर आणल्या.
झिंगाट गाण्यांनी तसेच मनवेधक संवादांनी नटलेल्या सैराटने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अशा या सैराटमय चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षकांना झी टॅाकीज’ व झी टॅाकीज एचडी’ रविवार २२ जानेवारी दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ६.०० वा.

Subscribe to receive free email updates: